rajkiyalive

SANGLI CRIME : ओन्ली आज्या टोळीला मोक्याच्या गुन्ह्यात अटक : न्यायालयातून घेतला ताबा. 

सांगली :

SANGLI CRIME : ओन्ली आज्या टोळीला मोक्याच्या गुन्ह्यात अटक : न्यायालयातून घेतला ताबा.  : किरकोळ वादातून अश्विनकुमार मल्हारी मुळके (वय ३०, नवीन वसाहत, सांगली) याचा निर्घृण खून केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या ‘ओन्ली आज्या’ टोळीला ‘मोक्का’ च्या गुन्ह्यात विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. टोळीला ‘मोक्का’ चा तपास करण्यासाठी दहा दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

SANGLI CRIME : ओन्ली आज्या टोळीला मोक्याच्या गुन्ह्यात अटक : न्यायालयातून घेतला ताबा. 

ओन्ली आज्या टोळीमध्ये टोळीप्रमुख अजय उर्फ अजित पांडुरंग खोत (वय २३, रा. वडर गल्ली, बाल हनुमान गल्ली), विकी प्रशांत पवार (वय २३), कुणाल प्रशांत पवार (वय २२), अमोल गंगाप्पा कुंचीकोरवी (वय २८), अर्जुन हणमंत पवार (वय २२, चौघे रा. अच्युतराव कुलकर्णी प्लॉट, वडर कॉलनी) आणि गणेश रामाप्पा ऐवळे (वय ३६, रा. गोकुळनगर, गल्ली क्र. २, सांगली), सुजित दादासाहेब चंदनशिवे (वय २९ रा. उत्तर शिवाजीनगर, फायर स्टेशनसमोर, सांगली) यांचा समावेश आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवार दि. १३ मार्च रोजी रात्री ११ च्या सुमारास नवीन वसाहत येथील गुरूद्वारजवळ घरासमोर अश्विनकुमार मुळके (वय ३०) थांबला होता. संशयित विकी पवार तेथून दुचाकीवरून चालला होता. विकीला हा रस्ता वाहतुकीसाठी नसल्याने जावू नको असे अश्विनकुमारने सांगितले. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर विकी तेथून गेला. अश्विनीकुमारचा बदला घेण्याच्या उद्देशाने दोन तासांनी मध्यरात्री १ च्या सुमारास  दुचाकीवरून सातजण अश्विनकुमारच्या घरासमोर आले.
त्याला बाहेर बोलवून धारदार शस्त्राने तसेच स्टंप, फरशीने हल्ला चढवला. हल्ल्यानंतर संशयित शस्त्राचा धाक दाखवत तेथून पसार झाले. दि. १४ रोजी उपचार सुरु असताना अश्विनकुमार याचा मृत्यू झाला. या खूनप्रकरणी सातजणांची टोळी अटकेत होती. या टोळीविरूद्ध ‘मोक्का’ लावण्यास कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक सुनील फुलारी यांनी मंजुरी दिली होती. टोळीची २०१४ पासून दहशत आहे. खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, गंभीर दुखापत आदी गुन्हे दाखल आहेत. टोळीला ‘मोक्का’ मध्ये अटक केली आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर दहा दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज