rajkiyalive

SHIROL VIDHANSABHA : शिरोळमध्ये माधवराव घाटगे यांच्या रूपाने भाजपला नवा चेहरा मिळणार?

जयसिंगपूर/ अजित पवार

SHIROL VIDHANSABHA : शिरोळमध्ये माधवराव घाटगे यांच्या रूपाने भाजपला नवा चेहरा मिळणार? : लोकसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. यामुळे ’ कौन कितने पानी मे’ हे आता स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यातील राजकीय समीकरणांना मोठा वेग आला आहे. भाजपने विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र लढण्यासाठी मतदार संघनिहाय चाचपणी सुरू केली आहे. भाजपच्या वतीने गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधवराव घाटगे यांना उतरविण्याबाबत हालचाली सुरू आहेत. घाटगे यांच्या निमित्ताने भाजपला शिरोळ तालुक्यात नवा चेहरा मिळणार काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

SHIROL VIDHANSABHA : शिरोळमध्ये माधवराव घाटगे यांच्या रूपाने भाजपला नवा चेहरा मिळणार?

विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना शिरोळ तालुक्यात मात्र या निवडणुकीसाठी अनेकांनी कंबर कसली आहे. भाजपचे नेते मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या संपर्कात एकनिष्ठ असलेले टाकळीवाडी येथील गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधवराव घाटगे या निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळाल्यास लढविण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे.

शिरोळ तालुक्यात आत्तापर्यंत चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयाचा निधी खेचून आणून रस्त्यांची डागडुजी यासह रस्ते बनवले आहेत. त्याचबरोबर टाकळीवाडीच्या गुरुदत्त शुगर्स कारखान्याच्या माध्यमातून अनेकांच्या हाताला रोजगार मिळवून दिला आहे. त्यांचे वडील स्व. भगवानराव घाटगे यांनी चिंचवाड येथून सुरू केला. माधवराव घाटगे यांनी त्यांच्या कार्याचा वसा पुढे चालू ठेवला आहे. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांनी काम सुरू ठेवले आहे.

घाटगे यांनी शिरोळ येथे खास. माने यांच्या प्रचारार्थ स्वतंत्र मेळावा घेऊन आपली ताकद पक्षश्रेष्ठांना दाखवून दिली होती.

लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार खास. धैर्यशील माने यांना निवडणुकीत शिरोळ तालुक्यातून मताधिक्य देण्यात माधवराव घाटगे कमी पडले नाहीत. घाटगे यांनी शिरोळ येथे खास. माने यांच्या प्रचारार्थ स्वतंत्र मेळावा घेऊन आपली ताकद पक्षश्रेष्ठांना दाखवून दिली होती. कारखान्याच्या माध्यमातून काम करत असताना शेतकर्‍यांच्या ऊसाला योग्य मोबदला देण्यासाठी त्यांनी एक पाऊल पुढे जात जास्तीत जास्त दर देण्याचा प्रयत्न केला आहे.

2014 च्या निवडणुकीत गोकुळचे माजी अध्यक्ष स्व. दिलीप पाटील, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष स्व. विठ्ठलराव नाईक निंबाळकर आणि माधवराव घाटगे यांनी पुढाकार घेत बहुजन विकास आघाडीची स्थापना केली होती. या आघाडीच्या माध्यमातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला रामराम ठोकलेले उल्हास पाटील यांना उमेदवारी देत आमदार केले होते.

या निवडणुकीत उल्हास पाटील यांना निवडून आणण्यात घाटगे यांचा सिंहाचा वाटा होता.

होऊ घातलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीत घाटगे यांना भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, दत्तचे संचालक अनिल यादव, दलितमित्र अशोकराव माने यांची साथ मिळेल आणि घाटगे या निवडणुकीत मजल मारू शकतील असा राजकीय जाणकारांचा कयास आहे.

माधवराव आता तुम्हीच आमदार व्हा….

लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार खास. धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ शिरोळ येथे झालेल्या मेळाव्यात बोलताना घाटगे म्हणाले, राज्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून आपण शिरोळ तालुक्यासाठी 75 कोटी रुपयाचा निधी खेचून आणला आहे. यानंतर भाषणात बोलताना मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, माधवराव आता तुम्हीच शिरोळ तालुक्याचे आमदार व्हा अशी ऑफर देऊन एक प्रकारे खळबळच उडवून दिली होती.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज