rajkiyalive

SANGLI CRIME NEWS : ट्रकच्या धडकेत आष्ट्यात युवक ठार

आष्टा –

SANGLI CRIME NEWS : ट्रकच्या धडकेत आष्ट्यात युवक ठार भिलवडी रस्त्यावर दूध वाहतूक करणार्‍या ट्रकने पल्सर मोटारसायकलला दिलेल्या धडकेत कृष्णा रमेश लोहार हा युवक ठार झाला. याबाबत राजाराम शंकर माने यांनी आरोपी ट्रकचालक अनिकेत लक्ष्मण माने वय 23 रा. टेलिफोन ऑफिस जवळ, खंडोबाचीवाडी ता. पलूस जि. सांगली याच्या विरुद्ध आष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

SANGLI CRIME NEWS : ट्रकच्या धडकेत आष्ट्यात युवक ठार

याबाबत आष्टा पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, सोमवार दि. 12 ऑगस्ट रोजी दुपारी सव्वा तीन वाजणेच्या सुमारास आष्टा – भिलवडी रस्त्यावर झिणगे वीटभट्टी लगत, हनुमान मंदिर जवळ आष्टा येथे दुधवाहतुक करणार्‍या ट्रकचालक अनिकेत लक्ष्मण माने याने त्याच्या ताब्यातील ट्रक क्र. एम.एच.12 क्यू. डब्ल्यू.6282 आष्ट्याचा दिशेने वेगाने चालवून तासगावच्या दिशेने जाणार्‍या बजाज पल्सर मोटारसायकल क्र. एम.एच.10 सी.एल.3159 यास जोरात धडक दिली. यात मोटारसायकल फरफट जाऊन कृष्णा लोहार हा मयत झाला.

अपघातात मयत कृष्णा लोहरचा पाय तुटून बाजूला झाला होता. घटनास्थळी बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. अधिक तपास आष्टा पोलीस करीत आहेत.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज