दहावीची परीक्षा 20 मार्च तर बाराची परीक्षा 11 फेबु्रवारीपासून सुरू

SHARE:

मुंबई :

दहावीची परीक्षा 20 मार्च तर बाराची परीक्षा 11 फेबु्रवारीपासून सुरू  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणार्‍या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. दहावी-बारावीच्या परीक्षेच्या तारखा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील परीक्षांच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या कालावधीमध्ये यावेळी दहा दिवसांचा फरक असणार आहे. यानुसार बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ऐवजी 11 फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा 1 मार्च ऐवजी 20 मार्चपासून घेण्यात येणार आहे.

दहावीची परीक्षा 20 मार्च तर बाराची परीक्षा 11 फेबु्रवारीपासून सुरू

बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या काळात होणार आहे. तर, दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या काळात होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने प्रसिद्धीपत्रक जारी करुन दिली आहे. यासोबत राज्य शिक्षण मंडळाकडून हरकती आणि सूचना पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करता यावे यादृष्टीने या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

निकालानंतर विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया महत्त्वाची असते. तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा या मंडळाच्या परीक्षेनंतर आयोजित केल्या जातात. त्यामुळे या परीक्षांचा अभ्यास करण्यास विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळायला हवा तसेच पुरवणी परीक्षा लवकर घेवून त्याचा निकाल लवकर लागायला हवा यासर्व बाबींचा विचार करुन 2024-25 ची शैक्षणिक वर्षात होणारी दहावी-बारावीची परीक्षेच्या कालवधीत मोठा बदल करण्यात आलाय. एबीपी माझाच्या वृत्तानुसार, फेब्रुवारी-मार्चमध्ये होणारी दहावी आणि बारावीची परीक्षा नेहमीपेक्षा 18 ते 10 दिवस घेण्याचा राज्य मंडळाचा मानस आहे.

बारावीची परीक्षा – मंगळवार, 11 फेब्रुवारी 2025 ते मंगळवार, 18 मार्च 2025
प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन : शुक्रवार, 24 जानेवारी 2025 ते सोमवार 10 फेब्रुवारी 2025

दहावीची परीक्षा : शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2025 ते सोमवार 17 मार्च 2025
प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन : सोमवार 3 फेब्रुवारी 2025 ते गुरूवार 20 फेब्रुवारी 2025

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *