rajkiyalive

sangli crime news : गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणार्‍या टोळीवर कारवाई : दहा लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

सांगली :

sangli crime news : गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणार्‍या टोळीवर कारवाई : दहा लाखांचा मुद्देमाल केला जप्त. : महाराष्ट्रात बंदी असलेल्या गोवा बनावटीच्या दारूची चोरटी वाहतूक करत शहरात तस्करी करणार्‍या टोळीचा पर्दाफाश सांगलीच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने केला. या टोळीकडून 8 लाख 83 हजार 430 रुपयांच्या मद्यासह साहित्य आणि एक कार असा एकूण 10 लाख 29 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

sangli crime news : गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणार्‍या टोळीवर कारवाई : दहा लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

या प्रकरणी सात जणांवर गुन्हे दाखल केले असून यातील चौघांना अटक केल्याची माहिती उत्पादन शुल्कचे अधीक्षक प्रदीप पोटे यांनी दिली. अब्दुलरझाक नजरूद्दीन मुलाणी (वय 26 रा. कवठेमहांकाळ), महम्मदकैफ बशीर बागवान (वय 20 रा. थबडेवाडी) आणि सिद्दीक मुबारक नदाफ (वय 18 पूर्ण रा. कवठेमहांकाळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे एक पथक शहरात अवैधरित्या येणार्‍या दारूवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकाला शहरातील विजयनगर येथे असणार्‍या सत्राळकर इमारती जवळ असणार्‍या कच्या रस्त्यावर काहीजण एका कार मधून बेकायदेशीर गोवा बनावटीची दारू वाहतूक करून विक्री करण्यासाठी आल्याची माहिती मिळाली. यावेळी पथकाने तातडीने त्याठिकाणी सापळा रचला असता एक कार (क्र. एमएच 13 सीएस 0795) हि येताना दिसली. सदरच्या गाडीचा संशय आल्याने थांबवून कारची तपासणी केली. यावेळी गाडीच्या डिक्की मध्ये विदेशी मद्याची गोवा बनावटीची दारू मिळाली.

संशयित तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदरचा बेकायदेशीर मद्यसाठा वानलेसवाडी येथील विजयनगर येथील शिवदत्त अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरून भरल्याची माहिती संशयित तिघांनी दिली. याठिकाणी देखील पथकांनी छापा टाकला असता त्याठिकाणी गोवा राज्यातून 750 मिलीच्या गोल्ड ईसीई ब्ल्यू व्हिस्की, गोल्ड अँड ब्लॅक ट्रिपल एक्स रम या प्लास्टिकच्या बाटल्यांमधून बेकायदेशीर गोव्यातून तस्करी करत असलेली मॅकडोल नंबर 1, डीएसपी ब्लॅक, इंपिरियल ब्ल्यू, रॉयल स्टॅग व्हिस्की 180 मिलीच्या बाटल्यांमध्ये बनावट टोपण लावून आजूबाजूच्या हॉटेल धारकांना विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले.

यावेळी गोवा बनावटीची बेकायदेशीर दारू, बाटल्या, टोपण आणि कार असा एकूण 10 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी सात जणांवर गुन्हे दाखल केले असून तिघांना अटक करण्यात आली आहे. सदरची कारवाई उत्पादन शुल्कचे अधीक्षक प्रदीप पोटे यांच्या पथकाने केली.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज