rajkiyalive

mahatma fule karjmukti yojna : महात्मा फुले कर्जमुक्तीच्या नव्या यादीत 6700 शेतकर्‍यांचा समावेश

जिल्ह्यातील 50 हजार नियमित शेतकरी गॅसवर

जनप्रवास । सांगली

mahatma fule karjmukti yojna : महात्मा फुले कर्जमुक्तीच्या नव्या यादीत 6700 शेतकर्‍यांचा समावेश : महात्मा फुले कर्जमाफी योजनेतंर्गत प्रोत्साहन अनुदानासाठी निवडणुकीच्या तोंडावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीत जिल्ह्यातील अवघ्या 6 हजार 700 शेतकर्‍यांची नावे आली आहेत. आत्तापर्यंत 80 हजार शेतकर्‍यांच्या खात्यावर प्रोत्साहन अनुदान जमा झाले आहे, मात्र तब्बल 50 हजार नियमित कर्जदार तब्बल साडेचार वर्षापासून वंचित असल्याचे स्पष्ट झाले. या शेतकर्‍यांना शासनाकडून निधी मिळणार का? याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

mahatma fule karjmukti yojna : महात्मा फुले कर्जमुक्तीच्या नव्या यादीत 6700 शेतकर्‍यांचा समावेश

महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 त्यामध्ये शेतकर्‍यांचे 2 लाखापर्यंतचे थकित कर्ज माफ करण्यात आले. त्यानंतर दुसर्‍या टप्प्यात शासनाने नियमित कर्जदारांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान जाहीर केले. त्यासाठी शासनाच्या अंदाजपत्रकात निधीची तरतूद करण्यात आली. मात्र अंमलबजावणी करण्याकडे दुर्लक्ष झाले. राज्यात सत्तांतर होवून शिंदे-फडणवीस सरकारने योजनेची अमंलबजवणी सुरु केली. नियमित कर्ज भरणार्‍या जिल्ह्यातील 1 लाख 62 हजार 795 पात्र शेतकर्‍यांच्या खात्यांची माहिती शासनाने पोर्टलवर अपलोड केली आहे.

मागील साडेचार वर्षात जिल्ह्यातील 80 हजार 337 शेतकर्‍यांच्या खात्यावर प्रोत्साहन अनुदानाची 294 कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे.

पन्नास हजार अथवा त्यापेक्षा कमी कर्ज असलेल्या शेतकर्‍यांच्या रकमेऐवढी रक्कम मिळाली. शासकीय, निमशासकीय कर्मचारी, आयकर भरणार्‍या लाभार्थींना योजनेतून वगळण्यात आले आहे. अशा सुमारे 22 हजार शेतकर्‍यांचा समावेश आहे. दोन वर्षापूर्वी आधार प्रमाणीकरण न झालेले तसेच तक्रारी असलेले 6 हजार शेतकर्‍यांनाही अद्याप प्रोत्साहन अनुदान मिळालेले नाही.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यातील 6 हजार सातशे शेतकर्‍यांची यादी सहकार विभागाला प्राप्त झाली आहे.

यापैकी 6 हजार शेतकर्‍यांनी आधार लिंक केले आहे. प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र ठरलेल्या (विशिष्ट क्रमांक देण्यात आलेल्या) परंतू आधार प्रमाणिकरण न झालेल्या शेतकर्‍यांसाठी दि. 7 सप्टेंबर 2024 पर्यंत आधार प्रमाणिकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या कालावधीत संबंधीत शेतकर्‍यांनी आधार प्रमाणिकरण करणे आवश्यक आहे. त्याबाबतचा लघुसंदेश महा-आयटी मार्फत देण्यात आलेला आहे.

याशिवाय जिल्ह्यातील अद्याप 50 हजार शेतकर्‍यांचे सुमारे 150 कोटी रुपयांचे प्रोत्साहन अनुदान लटकले आहे. शासनाकडून अनुदान वर्ग करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने पात्र शेतकरी अद्याप अनुदानापासून वंचित असल्याचे चित्र दिसून येते.

712 शेतकर्‍यांचे आधार लिंक नाही
जिल्ह्यातील 6 हजार सातशे शेतकर्‍यांची यादी सहकार विभागाला प्राप्त झाली आहे. यापैकी 6 हजार शेतकर्‍यांनी आधार लिंक केले आहे. अद्याप 712 शेतकर्‍यांचे आधार लिंक नाही. आधार प्रमाणिकरण न झालेल्या शेतकर्‍यांसाठी 7 सप्टेंबर 2024 पर्यंत आधार प्रमाणिकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी सांगितले.

नियमित कर्जदारांची माहिती
शेतकरी यादी अपलोड 1,62,795
अनुदान जमा शेतकरी 80,337
अनुदान मिळालेली रक्कम 294 कोटी
नव्याने आलेल्या यादीतील शेतकरी 6700
अनुदानापासून वंचित शेतकरी 50000

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज