rajkiyalive

khanapur atpadi vidhansabha : माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख काँग्रेस – राष्ट्रवादीच्या वाटेवर ?

कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणूक लढविण्याचा केला निर्धार ; सांगली जिल्ह्यात भाजपला बसणार धक्का

जनप्रवास / प्रताप मेटकरी
khanapur atpadi vidhansabha : माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख काँग्रेस – राष्ट्रवादीच्या वाटेवर ? : खानापूर विधानसभा मतदारसंघाच्या राजकीय पटलावर कायमच किंगमेकरच्या भूमिकेत असणारे आटपाडीचे माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख यांनी आगामी विधानसभा निवडणूकीत उतरण्याचा निर्धार केला आहे. कोणत्याही परिस्थितीत पुन्हा एकदा विधानसभेसाठी शड्डू ठोकून महाविकास आघाडीने उमेदवारी न दिल्यास अपक्ष म्हणून निवडणूक लढविणारच आहे. यंदाच्या विधानसभा निवडणूकीत थांबणार नाही, अशी भूमिका स्पष्ट केली आहे.

khanapur atpadi vidhansabha : माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख काँग्रेस – राष्ट्रवादीच्या वाटेवर ?

माझे राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलणे सुरू आहे. महाविकास आघाडीच्यावतीने मी खानापूर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे. महाविकास आघाडीने उमेदवारी न दिल्यास अपक्ष म्हणून निवडणूक लढविणारच आहे. यंदाच्या विधानसभा निवडणूकीत थांबणार नाही, अशी स्पष्ट भूमिका आटपाडीचे माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख यांनी दै. ङ्कजनप्रवासङ्खशी बोलताना व्यक्त केली.

पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे अनेक दिग्गज नेते शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीच्या गळाला लागत असताना गेल्या काही दिवसांपासून माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख हे देखील तुतारी हातात घेणार अशी चर्चा रंगली होती. परंतु आज त्यांनी दै. ङ्कजनप्रवासङ्खशी बोलताना प्रथमच राजकीय उघड भाष्य केले. खानापूर विधानसभा मतदारसंघ महायुतीत शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला आहे. त्यामुळे देशमुख यांची महायुतीशी पर्यायाने भाजपशी काडीमोड पक्की मानली जात आहे. देशमुख यांनी यावर शिक्कामोर्तब देखील केले आहे.

यावेळी बोलताना देशमुख म्हणाले, 2024 ची विधानसभा निवडणूक मी कोणत्याही परिस्थितीत लढविणारच आहे. हा मतदारसंघ महायुतीत शिवसेना शिंदे गटाकडे आहे. त्यामुळे मला महाविकास आघाडीचा पर्याय योग्य वाटतो. त्या अनुषंगाने माझे राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाशी बोलणे झाले आहे. तसेच काँग्रेस पक्षातील काही नेत्यांशी माझा संवाद सुरू आहे. मी दोन्ही काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी केली आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभूते भेटून गेले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीची उमेदवारी मला मिळेल, याची मला खात्री आहे. समजा महाविकास आघाडीची उमेदवारी आपणास मिळालीच नाही तर अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्यासाठी मी तयारी सुरू ठेवली आहे. कोणत्याही परिस्थितीत यावेळी निवडणूकीच्या रिंगणात मी उतरणार आहे, अशी रोखठोक भूमिका माजी आमदार देशमुख यांनी व्यक्त केली.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज