rajkiyalive

jain samaj news : दिगंबर जैन समाजाच्या मंदिरांवर कब्जा: मंगळवारी सांगलीत मोर्चा: तात्यासाहेब नेजकर

जनप्रवास । सांगली
jain samaj news : दिगंबर जैन समाजाच्या मंदिरांवर कब्जा: मंगळवारी सांगलीत मोर्चा: तात्यासाहेब नेजकर : भाजपची सत्ता आणि गुजराती श्वेतांबर जैन समाजाच्या पैशाच्या जोरावर राज्यातील दिगंबर जैन मंदिरांवर गुजराती श्वेतांबर जैन समजाकडून कब्जा केला जात आहे. अनेक ठिकाणी मारहाण झाल्याचा प्रकार देखील घडला आहे. या विरोधातील राज्यातील दिगंबर जैन समाज आक्रमक झाला असून राज्यात मोर्चे निघत आहेत. सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी मोर्चा काढून या दडपशाहीचा निषेध करण्यात येणार असल्याची माहिती बाल ब्रम्हचारी तात्याभैय्या नेजकर यांनी पत्रकार बैठकीत दिली.

jain samaj news : दिगंबर जैन समाजाच्या मंदिरांवर कब्जा: मंगळवारी सांगलीत मोर्चा: तात्यासाहेब नेजकर

ते म्हणाले, शिरपूर येथील चिंतामणी पार्श्वनाथ मंदिरात 43 मुर्ती आहेत. त्यातील एका मूर्तीचा वाद केवळ न्यायालयात आहे. त्यामुळे या मूर्तीच्या पुजेसाठी श्ेवतांबरांना रोज तीन तासाचा वेळ दिला आहे. त्याचा फायदा घेत त्यांना तेथे अतिक्रमण सुरु केले आहे. इतर मूर्तींचा विषय नसताना त्या मूर्तींना वस्त्र व अलंकार घातले जात आहे. या विरोध केल्यानंतर दिगंबर जैन समाजातील लोकांवर दमदाटी केली जात आहे. काही मद्यपी गुंडांना तेथे घुसवून हाणामारी केली आहे. या विरोधात पोलिसात तक्रार केली तर पोलीस तक्रार घेत नाहीत. उलट आमच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.

भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या दबावाखाली प्रशासनाकडून त्याला संरक्षण मिळत आहे. ही मंडळी भाजपच्या सत्तेचा गैरफायदा घेऊन दिगंबर जैन समाजाची गळचेपी करत आहेत. त्यामुळे आमच्यावर अन्याय होत आहे. हे लोण आता राज्यभर चालत आहे. पैठण, मांगीतुंगी, भादुकली, मुक्तागिरी, यलोरा, चिंतूरपर्यंत वाढताना दिसत आहे. आता दिगंबर जैन साहित्यावर गुजराती अतिक्रमण सुरु झाले आहे. राज्य शासनाच्या विविध समित्यांवर श्वेतांबरांची भरती अधिक आहे. जिल्हाधिकारी नियुक्त समित्यांवर त्यांचा टक्का अधिक आहे. दिगंबर जैन समाज शेती करतो, कष्ट करतो, या समाजात गरिब घटकांची संख्यादेखील अधिक आहे.

आता दिगंबर जैन समाजाने या अन्यायाविरोधात राज्यभर मोर्चे सुरू केले आहेत. सांगलीत मंगळवारी मोर्चा निघणार आहे. या मोर्चात श्री चंद्रप्रभू महाराज, विद्यासागर महाराज, विशालसागर महाराज सहसंघ सहभागी होत असल्याचे बाल ब्रम्हचारी तात्याभैय्या नेजकर यांनी सांगितले. यावेळी रवींद्र पाटील, सुहास पाटील, अ‍ॅड. सुहास चिप्रे, किरण इंगळे, सज्जन आळतेकर, संदीप आवटी, शीतल पाटील, शांतीनाथ पाटील आदी उपस्थित होते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज