rajkiyalive

islampur vidhansabha election 2024 : आ.जयंतराव पाटील 24 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार

कार्यकर्त्यांची जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी

इस्लामपूर : प्रतिनिधी
islampur vidhansabha election 2024 : आ.जयंतराव पाटील 24 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आ.जयंतराव पाटील हे गुरुवार 24 ऑक्टोबर रोजी इस्लामपूर येथे महाविकास आघाडीच्यावतीने आठव्यांदा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. गुरुवारी सकाळी 10 वाजता वाळवा पंचायत समितीपासून भव्य रॅली शहराच्या मुख्य मार्गावरून गांधी चौकात येईल. येथे रॅलीचे सभेत रूपांतर केले जाईल. यानंतर आ.पाटील हे उमेदवारी अर्ज दाखल करतील.

islampur vidhansabha election 2024 : आ.जयंतराव पाटील 24 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार

इस्लामपूर, आणि शहरासह वाळवा तालुका व मिरज तालुक्यातील 8 गावातील हजारो कार्यकर्ते व नागरिक उपस्थित राहतील, अशी माहिती राष्टवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. आघाडीतील मित्रपक्षांसह आम्ही एकदिलाने ही निवडणूक लढवू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

प्रा.शामराव पाटील, माजी नगराध्यक्ष अँड.चिमणभाऊ डांगे, शहराध्यक्ष शहाजी पाटील, पै.भगवान पाटील, माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव, तालुकाध्यक्षा सुनिता देशमाने, संजय पाटील, माजी नगरसेवक खंडेराव जाधव, अँड.धैर्यशिल पाटील, विश्वनाथ डांगे, राज्य सरचिटणीस अरुण कांबळे, सुरेशदादा पाटील, संदीप पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
विजयराव पाटील म्हणाले, राज्यातील जनता महागाई व भ्रष्ट्राचाराने त्रस्त असून शेती मालास भाव नाही. मुलांच्या हाताला रोजगार नाही. महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. कायदा व सुव्यवथा ढासळली आहे. त्यामुळे राज्यात बदल होणार आहे.
अँड. चिमण डांगे म्हणाले, आ.जयंतराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज शक्तीप्रदर्शनाने भरणार आहोत. मतदार व कार्यकर्त्यांची रॅली झरी नाका, आझाद चौक, गणेश मंडई, कापूसखेड नाका, यल्लमा चौकातून गांधी चौकात येईल. येथे जाहीर सभा होईल. दुपारी 2 नंतर अर्ज दाखल केला जाईल. सभेस महाविकास आघाडीतील मित्रपक्षांना, नेत्यांना आमंत्रीत करीत आहोत.
प्रा.शामराव पाटील म्हणाले, आ.जयंतराव पाटील यांनी गेल्या 40 वर्षात तालुका व मतदार संघाचा सर्वांगीण विकास करताना सर्वांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले आहे. मतदार संघातील जनतेने त्यांना 7 वेळा मोठ्या फरकाने निवडून दिले आहे. यावेळीही त्यांचे मताधिक्य 1 लाखांवर राहील. त्यांचे मॉडेल स्कूल, स्मार्ट पीएचसी हे उपक्रम राज्यात राबविले जात आहेत.
शहाजी पाटील म्हणाले, नेता व जनतेचे नाते कसे असावे, हे शिवस्वराज्य यात्रेच्या सांगता सभेच्या निमित्ताने संपूर्ण राज्याने पाहिले आहे. परवासारखीच अर्ज भरण्याची रॅली व सभा भव्य होईल.
खंडेराव जाधव म्हणाले, आ.जयंतराव पाटील यांचे काम आणि त्यांची सध्याच्या राजकारणातील भूमिका पाहता ही निवडणूक बिनविरोध व्हायला हवी अशी जनतेची इच्छा आहे. मात्र विरोधक एकमेकांचे उसने उमेदवार घेऊन रडीचा डाव खेळत आहेत. त्यांच्याकडे कोणताही विचार, विकास नाही.
अँड. धैर्यशिल पाटील म्हणाले, राज्यात परिवर्तनाची लाट असून, राज्यात निश्चितपणे महाविकास आघाडीचे सरकार येईल. युवक तालुकाध्यक्ष संग्राम जाधव, महिला शहराध्यक्षा पुष्पलता खरात, माजी अध्यक्षा रोझा किणीकर, शंकरराव चव्हाण, शैलेश पाटील, दिग्विजय पाटील, सचिन कोळी, अभिजित रासकर, विशाल माने यांच्नयासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज