rajkiyalive

ladki bahin yojna : लाडक्या बहिणी दिवाळी बोनसपासून मुकणार? निवडणूक आयोगाने योजना रोखली

मुंबई :

ladki bahin yojna : लाडक्या बहिणी दिवाळी बोनसपासून मुकणार? निवडणूक आयोगाने योजना रोखली : महाराष्ट्रात काही महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली होती. याद्वारे महिलांना महिन्याला दीड हजार रुपये दिले जात होते. यासाठी आतापर्यंत जवळपास 2.4 कोटी महिलांना पाच महिन्यांचे पैसे मिळाले होते. यातच शिंदे सरकारने दिवाळी बोनसही जाहीर केला होता. याबरोबरच पुढील महिन्याचे पैसेही दिले जाणार होते. याची महिला वाट पाहत असताना निवडणूक आयोगाने निवडणूक काळात या योजनेचे पैसे पाठविण्यावर बंदी आणली आहे.

ladki bahin yojna : लाडक्या बहिणी दिवाळी बोनसपासून मुकणार? निवडणूक आयोगाने योजना रोखली

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. यामुळे राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. यामुळे या काळात मतदारांना थेट प्रभावित करणार्‍या आर्थिक योजना बंद करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. या आदेशांनंतर महिला व बाल कल्याण विभागाने लाडकी बहीण योजनेचा पैसा रोखला आहे. यामुळे पुढील दोन महिने या योजनेचे पैसे महिलांना मिळणार नाही. यामुळे आता या महिलांना डिसेंबरच्या हप्त्याची वाट पहावी लागणार आहे.

मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी सर्व विभागांना याबाबत विचारणा केली होती. त्यांना प्राप्त झालेल्या माहितीमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ दिला जात असल्याचे समोर आले होते. यामुळे या योजनेची विस्तृत माहिती मागविण्यात आली आहे. चार दिवसांपूर्वीच या योजनेचा पैसा रोखण्यात आल्याचे विभागाने निवडणूक आयोगाला कळविले आहे. याबाबतचे वृत्त एनबीटीने दिले आहे.

दिवाळी बोनसचे काय?

लाडक्या बहिणीला निवडणुकीच्या तोंडावर खूश करण्यासाठी शिंदे सरकारने दिवाळी बोनसची घोषणा केली होती. याद्वारे 3000 रुपयांचा बोनस दिला जाणार होता. परंतू, निवडणूक आयोगाच्या कारवाईनंतर लाडक्या बहिणीला आता हा दिवाळी बोनस मिळणार नाही. तसेच डिसेंबरमध्ये दिवाळी बोनस मिळेल की नाही याची काहीही शाश्वती नाही.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज