sangli vidhansabha news ” सांगलीत काँग्रेसमध्ये बंडखोरी अटळ जयश्रीताई पाटील यांनी सुरू केला प्रचार :सांगली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी बंडखोरी करत अर्ज दाखल केला आहे. त्यांची नाराजी दूर होईल, अशी परिस्थिती असताना त्यांनी सांगली शहर व ग्रामीण भागात प्रचाराला सुरूवात केली आहे. गुरूवारी शहरातील नागरिकांच्या गाठीभेटी त्यांनी घेतल्या. त्यामुळे काँग्रेसमध्ये बंडखोरी होण्याची दाट शक्यता आहे.
sangli vidhansabha news ” सांगलीत काँग्रेसमध्ये बंडखोरी अटळ जयश्रीताई पाटील यांनी सुरू केला प्रचार
सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जयश्रीताई पाटील इच्छूक होत्या. काँग्रेस पक्षाने पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिली. तर जयश्रीताई पाटील यांनी समर्थकांचा मेळावा घेऊन अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून कांँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी जयश्रीताई पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र दुसरीकडे जयश्रीताई पाटील यांनी प्रचाराला सुरूवात केले असल्याचे चित्र आहे.
गुरूवारी हरिपूर, धामणी, अंकलीत जाऊन नागरिकांच्या भेटी घेतल्या. मिरज येथील हजरत सय्यद ख्वाजा शमना मोहम्मद मीरा दर्गाला भेट दिली. शहरातील वृत्तपत्र विक्रेते, प्रभाग क्रमांक पंधरामधील विविध भागात त्यांनी बैठका घेतल्या. अनेकांनी माघार घेऊ नका, तुम्ही लढा, अशी मागणी देखील केली आहे. सांगली विधानसभा मतदारसंघातील गावे व शहरातील प्रभागांमध्ये जयश्रीताई पाटील यांचे दिवाळी शुभेच्छांचे पत्रक वाटप केले जात आहे. त्यामुळे जयश्रीताई पाटील बंडखोरीवर ठाम असल्याचे बोलले जात आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.