सांगली प्रतिनिधी-
sangli vidhansabha news : जयश्रीताई पाटील यांचा होम टू होम प्रचार, उस्फुर्त प्रतिसाद : माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील घराण्याचा वारसा चालवणाऱ्या स्वर्गीय विष्णू अण्णा पाटील आणि स्वर्गीय मदन भाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असलेल्या जयश्री मदन भाऊ पाटील या सांगली विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवीत आहेत. त्यांचे चिन्ह हिरा हे असून सांगली शहरासह ग्रामीण भागामध्ये होम टू होम प्रचारावर त्यांनी भर दिला आहे .त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे .
sangli vidhansabha news : जयश्रीताई पाटील यांचा होम टू होम प्रचार, उस्फुर्त प्रतिसाद
जयश्री पाटील यांनी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली होती ,पण ती त्यांना मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे जोरदार शक्ती प्रदर्शनासह प्रचार प्रारंभ सभा घेऊन त्यांनी आपला लोकसंग्रह दाखवला आहे. सांगलीतील अनेक आजी-माजी सदस्य, नगरसेवक, मार्केट कमिटी, सांगली विष्णूंअण्णा खरेदी विक्री संघ, यांच्यासह साखर कारखाना संचालक आणि मदन भाऊ पाटील युवा मंचचे सर्व कार्यकर्ते त्यांच्यासोबत प्रचारात सक्रिय आहेत, त्याचप्रमाणे खासदार विशाल पाटील, डॉ सिकंदर जमादार,संग्राम पाटील रोहिणी पाटिल,मदन भाऊ युवा मंचचे आनंद लेंगरे, नितीन लोंढे यांच्यासह अनेक जबाबदार कार्यकर्ते प्रचार यंत्रणा राबवत आहेत.
सध्या त्यांनी होम टू होम प्रचारावर भर दिला असून उमेदवाराच्या थेट संपर्क मुळे आणि महिला उमेदवारी यामुळे त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. वसंतदादा घराण्याचे कार्य महिला म्हणून असलेली सहानुभूती ह्या त्यांच्या जमेच्या बाजू ठरत आहेत .सांगली शहरासह बुधगाव ,नांद्रे, कवलापूर, माधवनगर, पदमाळे ,कर्नाल, बिसुर, धामणी ,अंकली, हरिपूरआधी सर्व ग्रामीण भागातून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.