rajkiyalive

sangli crime news : सांगलीत सोनारास जीवे मारण्याची धमकी देत मागितली दहा लाखांची खंडणी : कुपवाडमधील दोघांवर गुन्हा दाखल.

sangli crime news : सांगलीत सोनारास जीवे मारण्याची धमकी देत मागितली दहा लाखांची खंडणी : कुपवाडमधील दोघांवर गुन्हा दाखल. : सांगली : शहरातील चांदणी चौक येथे असलेल्या सराफाला घरात घुसून चाकूचा धाक दाखवून डाऊ पितानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत दहा लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला. सदरची घटना हि दि. 02 ऑगस्ट 2024 आणि सोमवार दि. 23 डिसेंबर 2024 या कालावधीत घडली.

sangli crime news : सांगलीत सोनारास जीवे मारण्याची धमकी देत मागितली दहा लाखांची खंडणी : कुपवाडमधील दोघांवर गुन्हा दाखल.

या प्रकरणी आकाश संभाजी माने (वय 35 रा. मूळ बामणी ता. खानापूर सध्या चांदणी चौक, सांगली) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी राहूल उर्फ राजू सदाशिव मक्ते (वय 30) आणि किशन सुनील राजमाने (वय 30 दोघे रा. सूतगिरणी चौक, कुपवाड) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आकाश माने हे आपल्या कुटुंबियांसह शहरातील चांदणी चौक परिसरात राहतात. संशयित दोघेजण माने यांच्या ओळखीचे आहेत. संशयित मक्ते आणि राजमाने हे आकाश माने यांनी दिलेल्या पैशांचा वापर दारू पिऊन चैनी करण्यासाठी करत होते. तसेच माने यांच्या ऑफिसवर येऊन दंगा करत असतात त्यामुळे माने यांनी त्यांना पैसे देणे बंद केले होते. ऑफिसवर दारू पिऊन येऊ नका असे सांगितले असता त्यांनी तुम्ही कुठे साजूक आहेत.

तुम्ही दारू पिल्याचे फोटो आमच्याकडे आहेत ते समाजमाध्यमांवर प्रदर्शित करू अशी धमकी देत शिवीगाळी केली. यानंतर सोमवार दि. 23 डिसेंबर रोजी माने हे घरी असताना संशयित दोघेजण यांच्या घरी गेले. हेडरूमला लाथ मारून हातातील चाकू दाखवून आज संध्याकाळ पर्यंत दहा लाख रुपये दे आणि सांगली सोडून जायचे नाहीतर ठार मारणार तुझी नेतेगिरी चालू देणार नाही अशी धमकी देत निघून गेले. वारंवार होणार्‍या त्रासाला कंटाळून आकाश माने यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज