islampur news : आविष्कार कल्चरल गु्रपच्या अध्यक्षपदी प्रा. कृष्णा मंडले, कार्याध्यक्षदी भूषण शहा : राज्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात आघाडीची संस्था म्हणून ओळखल्या जाणार्या इस्लामपूर येथील आविष्कार कल्चरल ग्रुप च्या अध्यक्षपदी प्रा.कृष्णा मंडले (कासेगाव), कार्याध्यक्षपदी भूषण शहा (इस्लामपूर), उपाध्यक्षपदी राजेंद्र माळी (इस्लामपूर),तर सचिवपदी विजय लाड (राजारामनगर) यांची निवड करण्यात आली आहे.
islampur news : आविष्कार कल्चरल गु्रपच्या अध्यक्षपदी प्रा. कृष्णा मंडले, कार्याध्यक्षदी भूषण शहा
माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था गेल्या 23 वर्षापासून सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहे. या संस्थेने राज्य व देशातील 75 हून अधिक दिग्गज कलाकारां च्या संगीत रजनी कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन केलेले आहे.
नूतन पदाधिकारी-सहसचिव-विजय नायकल (नायकलवाडी),खजिनदार – विश्वास कदम (मसुचीवाडी). कार्यकारी समिती-नजीर शेख (माजी कार्याध्यक्ष),सुनिल चव्हाण (मावळते अध्यक्ष),प्रा.प्रदीप पाटील (मावळते कार्याध्यक्ष),सतिश पाटील (माजी अध्यक्ष), विश्वनाथ पाटसुते (मावळते सचिव),लव्हाजी देसाई (इस्लामपूर),विनायक यादव (बनेवाडी).
आविष्कार कल्चरल ग्रुपचे मार्गदर्शक मोहनराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत पुढील 3 वर्षासाठी या नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यावेळी सचिनकाका पाटील,माजी संचालक डी.बी.पाटील,माजी सरपंच बाबुराव पाटील, सुजित पाटील (बहे),संजय पाटील (तांबवे), बाळासाहेब पाटील (नवेखेड),अनिल पाटील (आष्टा) यांच्यासह कार्यकर्ते व सदस्य उपस्थित होते.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.