rajkiyalive

sangli news : मौजे डिग्रजमध्ये स्मार्ट मीटरविरोधात शेतकरी संघटनेची निदर्शने

sangli news : मौजे डिग्रजमध्ये स्मार्ट मीटरविरोधात शेतकरी संघटनेची निदर्शने : महावितरण कंपनीने राज्यातील सर्व वीज ग्राहकांना स्मार्ट प्रिपेड मीटर्स लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे वीज दरामध्ये वाढ होणार आहे, अंदाजे किमान 30 पैसे प्रतियुनिट वाढ होणार आहे. त्यामुळेच स्वतंत्र भारत पक्षाचा या निर्णयाला विरोध करण्यासाठी स्वतंत्र भारत पक्षाच्यावतीने सोमवारी मौजे डिग्रजमध्ये निदर्शने करण्यात आली.

sangli news : मौजे डिग्रजमध्ये स्मार्ट मीटरविरोधात शेतकरी संघटनेची निदर्शने

महाराष्ट्र शासनाच्या व महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या प्रिपेड मीटर्स बसवण्याच्या निर्णयाच्या विरोधात मौजे डिग्रज मध्ये महावितरण कंपनीचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध नोंदवण्यात आले. स्मार्ट मीटर्स कंपनीच्या खर्चाने मोफत लावणार अशी खोटी व चुकीची जाहिरात केली आहे. वीज कायद्यानुसार कोणता मीटर वापरायचा याचे स्वातंत्र्य व मीटरची निवड करण्याचे कायदेशीर हक्क संबंधित ग्राहकाला आहेत. कंपनी अघोषित सक्ती करून ग्राहकाच्या या हक्काचे कायदेशीर तरतुदीचे संपूर्ण उल्लंघन करीत आहे. ग्राहक म्हणून आमच्या हक्कानुसार आमचा सध्याचा आहे. तोच पोस्टपेड मीटर पुढे कायम ठेवण्यात यावा, अशी मागणी आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली.

प्रत्येक ग्राहकामागे कमीत कमी 11 हजार 100 रुपये प्रतिमीटर खर्च कर्ज काढून केला जाणार आहे.

प्रिपेड मीटरसाठी केंद्र सरकारचे प्रति मीटर 100 रुपये अनुदान वगळता प्रत्येक ग्राहकामागे कमीत कमी 11 हजार 100 रुपये प्रतिमीटर खर्च कर्ज काढून केला जाणार आहे. हा खर्च ग्राहकांवरच लादता येणार नाही. या खर्चामुळे कर्जावरील व्याज, घसारा व संबंधित खर्चासाठी वीज दरामध्ये वाढ होणार आहे. ही वाढ अंदाजे किमान 30 पैसे प्रतियुनिट व अधिक होईल. हे मीटर वापरणार नसलेमुळे या वाढीव दराचा कोणताही बोजा लादता येणार नसल्याचा इशारा देण्यात आला.

यावेळी श्रीपाल बिरनाळे, रावसाहेब पाटील, महादेव भोसले, प्रकाश साळुंखे, दीपक लांडे, बाळासो पाटील, तात्या परीट, राजू हौंजे, धनपाल पाटील, अरविंद पाटील, राम कुडलापगोळ, अनिल पाटील, सतिश पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज