rajkiyalive

sangli news : दीड वर्षानंतर माधवनगर रेल्वे उड्डाणपुलावरून दुहेरी वाहतूक सुरू

पुलावर स्ट्रिट लाईटची गरज: अपघाताची शक्यता

sangli news : दीड वर्षानंतर माधवनगर रेल्वे उड्डाणपुलावरून दुहेरी वाहतूक सुरू : माधवनगर रोडवरील चिंतामणीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम तब्बल दीड वर्षांनी पूर्ण झाले असून आता पुलाच्या दोन्ही बाजुने पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू करण्यात आली आहे. डांबरीकरणाचे काम देखील आता पूर्ण झाले आहे. या पुलाच्या कामाला तब्बल एक वर्ष विलंब झाला. पुलावर अद्याप स्ट्रिट लाईट बसविल्या नाहीत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. आता तातडीने स्ट्रिट लाईट बसविणे आवश्यक आहेत.

sangli news : दीड वर्षानंतर माधवनगर रेल्वे उड्डाणपुलावरून दुहेरी वाहतूक सुरू

दक्षिण-मध्य रेल्वेच्या मिरज-पुणे या लोहमार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाच्या कामासाठी चिंतामणीनगर येथील पुलावरील वाहतूक काम दि. 10 जून 2023 नंतर बंद करण्यात आली. त्यानंतर नवीन चारपदरी पुलाच्या कामाला सुरूवात करण्यात आली होती. दि. 10 जानेवारी 2024 पर्यंत काम पूर्ण करण्याची अट ठेकेदाराला घालण्यात आली होती. तोपर्यंत या रस्त्यावरील वाहतूक वळविण्यात आली होती. सांगलीतून तासगाव, विट्याकडे जाण्या-येण्यासाठी जुना बुधगाव रस्ता आणि संजयनगरमार्गे किंवा माधवनगर जकात नाक्यातून कर्नाळ रोड म्हसोबामार्गे दोन पर्यायी रस्ते होते.

मात्र जुना बुधगाव रस्त्यावर सतत होत असलेल्या रेल्वे क्रॉसिंगमुळे वाहनधारकांचे प्रचंड हाल झाले होते.

पुलाचे काम तातडीने पूर्ण होण्यासाठी माजी आमदार नितीन शिंदे, सतीश साखळकर यांनी अनेक आंदोलने केली. या आंदोलनाची दखल रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आली होती. त्यानुसार ठेकेदाराला दंडाची आकारणी करून तातडीने काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. गेल्या महिन्यात या पुलावरून वाहतूक सुरू करण्यात आली होती. पण पुलावरील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले नव्हते. गेल्या आठवड्यात दोन्ही बाजुंचे डांबरीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे पुलावरील दुहेरी वाहतूक सुरू झाली आहे.

सध्या पुलावर स्ट्रिट लाईट नाहीत. त्यामुळे पुलावर अंधार आहे. शिवाय ऊस ट्रॅक्टर-टॉलीची वाहतूक देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे रात्रीच्यावेळी अपघात होण्याची दाट शक्यता असल्याने तातडीने पुलावर स्ट्रिट लाईट बसवाव्यात, अशी मागणी आता वाहनधारकांतून होत आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज