भ्रूणहत्या रोखल्यास तीर्थंकरांसारखे देव जन्माला येतील: विशुद्धसागर महाराज
jain samaj news : नांदणीत तीर्थंकरांचा जन्मकल्याणक उत्साहात: शेतातील बीज अंकुरचे रक्षण केल्यास रोटी मिळते. तसेच भ्रूणहत्या रोखल्यास भगवान श्रीराम, श्रीकृष्ण, 24 तीर्थंकरसारखे देव जन्माला येतील व असे आशीर्वचन आचार्य विशुद्धसागर महाराजांनी दिले.
jain samaj news : नांदणीत तीर्थंकरांचा जन्मकल्याणक उत्साहात
नांदणी (ता. शिरोळ) येथील पंचकल्याण महामहोत्सवात प्रवचनप्रसंगी आचार्य विशुद्धसागर महाराज म्हणाले, सुख हा आत्म्याचा धर्म आहे. प्रत्येक जीवाला सुखशांती हवी आहे. जो तणावात जगतो तो महापापी जीव आहे. ज्याचे मन बदलत नाही त्याचे जीवन बदलत नाही. कुळ, धर्म, परंपरा क्षत्रिय असतील तर तेथे तीर्थंकर जन्म घेतात.
आज पंचकल्याण महामहोत्सवाच्या तिसर्या दिवशी तीर्थंकरांचा जन्म कल्याण सोहळा धार्मिक वातावरणात व मोठ्या उत्साहात पार पडला.
धार्मिक कार्यक्रमात मुख्य सुवर्ण सौभाग्यवतीच्या हस्ते पीतकलश अभिषेक, जन्मकल्याण विधान पांडूकशिलेवर जन्माभिषेक सोहळा धार्मिक वातावरणात संपन्न झाला. त्यानंतर रात्री तीर्थंकरांचा नामकरण सोहळा, दोन्ही ओढणे, बाललीला कुमार क्रीडा व संगीता आरती आदी कार्यक्रम संपन्न झाले.
आजच्या धार्मिक कार्यक्रमात उपस्थित आचार्य साधूंचे प्रवचन झाले.
या कार्यक्रमासाठी भानुकीर्ती भट्टारक महास्वामी, शिमोगा येथील वन विभागाचे डॉ. ए. कलाप्पा, डी. ए. पाटील, कर्मवीर मल्टीस्टेटचे अध्यक्ष अरविंद मजलेकर, सतीश मुंग्यानवर, ए. सी. पाटील, अथनी शुगरचे संचालक राजेंद्र पाटील, अनिल यलगुद्री, सरपंच संगीता तगारे आदी उपस्थित होते.
महोत्सव समितीच्यावतीने अन्नदान केलेल्या दातारांचे व मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. नऊ दिवस चालणार्या या धार्मिक विधीमध्ये प्रतिष्ठाचार्य म्हणून अनिल कलाजे, बाहुबली उपाध्ये, महावीर उपाध्ये, आदिनाथ पंडित व अन्य प्रतिष्ठाचार्य योगदान देत आहेत.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.