rajkiyalive

sangli bjp news : भाजपमधून विलासराव जगताप आणि तम्मणगौडा रविपाटील यांची हकालपट्टी

जत तालुक्याच्या राजकारणात मोठी खळबळ

sangli bjp news : भाजपमधून विलासराव जगताप आणि तम्मणगौडा रविपाटील यांची हकालपट्टी : जत तालुक्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवत भारतीय जनता पक्षाने आपल्या दोन बंडखोर नेत्यांना पक्षातून निलंबित केले आहे.माजी आमदार विलासराव जगताप आणि माजी सभापती तम्मणगौडा रविपाटील यांच्यावर पक्षशिस्तीचा भंग केल्याचा ठपका ठेवत भाजपने कठोर पाऊल उचलले आहे. भाजप पक्षाच्या राज्य कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी अधिकृत पत्राद्वारे ही कारवाई जाहीर केली.

sangli bjp news : भाजपमधून विलासराव जगताप आणि तम्मणगौडा रविपाटील यांची हकालपट्टी

जत विधानसभा निवडणुकीत दोन्ही नेत्यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करून भाजपच्या निर्णयाला छेद दिला होता.या कृतीमुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना मोठा फटका बसल्याचे मानले जात आहे.यामुळेच त्यांना पक्षविरोधी कारवाईचा सामना करावा लागला आहे.पक्षशिस्तीचे उल्लंघन करणार्‍या कोणत्याही नेत्याला पक्षामध्ये स्थान दिले जाणार नाही,असा ठाम संदेश भाजपने या निर्णयाद्वारे दिला आहे.जिल्हा स्तरावर काम करणार्‍या नेत्यांसाठी ही कारवाई धडा ठरेल, असे पक्षाचे वरिष्ठ बोलत आहेत.

विलासराव जगताप यांचा राजीनामा आणि बंडखोरी

लोकसभा निवडणुकीदरम्यान माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या उमेदवारीला उघड विरोध करत विलासराव जगताप यांनी स्वतः भाजपला राजीनामा दिला होता.मात्र,त्यानंतरही त्यांनी केलेल्या हालचाली पक्षविरोधी असल्याचे मानले गेले. त्यांच्या बंडखोरीमुळे जत तालुक्याच्या राजकारणात भाजपसाठी अडचणी निर्माण झाल्या.

तम्मणगौडा रविपाटील यांचा बंडखोरीचा इतिहास

माजी सभापती तम्मणगौडा रविपाटील यांची बंडखोरी याआधीच चर्चेत होती. त्यांनी अनेकदा पक्षविरोधी भूमिका घेतल्याचे पक्षनेत्यांनी अधोरेखित केले. त्यांच्या निर्णयांमुळे जत तालुक्याचे राजकीय समीकरण बदलत असल्याचे चित्र आहे. यामुळेच त्यांना पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय घेतला गेला.

आ. गोपीचंद पडळकर यांच्या हस्तक्षेपामुळे निर्णयाला गती

या प्रकरणात भाजपचे नेते आणि जत विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आ. गोपीचंद पडळकर यांच्या हस्तक्षेपामुळेच हा निर्णय लवकर झाला असल्याची चर्चा आहे. पडळकर यांनी पक्षशिस्तीच्या मुद्द्यावर ठाम राहून ही कारवाई होण्यासाठी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्याचे सांगितले जाते.

जतच्या राजकारणावर संभाव्य परिणाम

विलासराव जगताप आणि तम्मणगौडा रवि पाटील यांच्या निलंबनामुळे जत तालुक्याचे राजकीय गणित मोठ्या प्रमाणावर बदलण्याची शक्यता आहे.आगामी निवडणुकांमध्ये भाजपच्या उमेदवारांना नव्याने रणनीती आखावी लागणार आहे.

भाजपच्या या कठोर कारवाईमुळे पक्षाच्या शिस्तीचा संदेश सर्व स्तरांवर पोहोचला आहे. मात्र, या निर्णयामुळे जत तालुक्यातील राजकीय परिस्थिती कितपत बदलते,हे आगामी काळात दिसेल विलासराव जगताप आणि.तम्मणगौडा रविपाटील यांची पुढील भूमिका काय असेल,याकडे देखील सगळ्यांचे लक्ष लागले आहे

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज