sangli bank news : जिल्हा बँकेला जुन्या नोटांमुळे वर्षाला 1.25 कोटीचा भुर्दंड

SHARE:

पाचशे, हजाराच्या नोटांचे 14.72 कोटी रुपये पडून, प्रकरण न्यायालयात

sangli bank news : जिल्हा बँकेला जुन्या नोटांमुळे वर्षाला 1.25 कोटीचा भुर्दंड : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने नोव्हेंबर 2016 मध्ये अचानक नोटाबंदी जाहीर करीत पाचशे व हजारच्या नोटा चलनातून बाद केल्या. नागरिक, संस्थांकडील शिल्लक नोटा जमा करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा बँकांना केवळ चार दिवसांची मुदत देण्यात आली. या मुदतीत जमा झालेल्या पण केंद्र सरकार, रिझर्व्ह बँकेने न स्वीकारलेल्या 14.72 कोटी रुपयांच्या जुन्या चलनातील नोटा अद्यापही जिल्हा बँकेत पडून आहेत. या नोटांच्या देखभालीवर संबंधित बँकेला वर्षाला सरासरी 1.25 कोटी रुपयांचा भुर्दंड बसत आहे. जुन्या नोटांप्रकरणी सांगलीसह आठ जिल्हा बँकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्याबाबतचा अद्याप निर्णय प्रलंबित आहे.

sangli bank news : जिल्हा बँकेला जुन्या नोटांमुळे वर्षाला 1.25 कोटीचा भुर्दंड

देशातील काळ्या पैशाला पायबंद घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2026 रोजी रात्री साडेआठ वाजता देशात नोटाबंदी जाहीर केली, त्यावेळी चलनात असलेल्या पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या. मात्र नागरिक, विविध संस्थांकडे असलेल्या या नोटा बँकांत जमा करण्यासाठी केंद्र सरकारने मुदत दिली. देशातील सर्व बँकांत या नोटा जमा करण्यास जवळपास महिनाभर मुदत होती. यात राष्ट्रीयकृत, खासगी बँकांसह शेड्यूल, नागरी सहकारी बँकांचाही समावेश होता. मात्र, राज्यातील सर्व जिल्हा बँकांना या नोटा स्वीकारण्यास केवळ चार दिवसांची मुदत देण्यात आली.

या कालावधीत राज्यातील जिल्हा बँकांतून सुमारे पाच हजार कोटी रुपयांच्या जुन्या नोटा बदलून दिल्याचा अंदाज

व्यक्त करण्यात आला होता. केंद्र सरकार, आरबीआयने याची गंभीर दखल घेत काही बँकांची चौकशी लावली. सांगली जिल्हा बँकांसह अन्य काही जिल्हा बँकांवर ईडी, आयकर विभागाचे छापे पडले. जिल्हा बँकांत बदलून दिलेल्या नोटांच्या खातेदारांची चौकशी करण्यात आली.

जिल्हा बँकांत जमा झालेल्या या जुन्या नोटा जमा करून घेऊन नवीन नोटा देण्यास विलंब झाला.

नवीन नोटांची छपाई वेळेत होत नसल्याने बँकांना त्या पुरवण्यात अडचणी आल्या. जिल्हा बँकांत जमा झालेल्या जुन्या नोटांपैकी बहुतांश रक्कम आरबीआयने स्वीकारली. पण राज्यात आठ जिल्हा बँकांतील 101 कोटी 18 लाख 51 हजार रुपये अडकले. त्यामध्ये सांगली जिल्हा बँकेचे 14 कोटी 72 लाख रुपयांचा समावेश आहे. या नोटा न स्वीकारल्याने जिल्हा बँकेला वर्षाला सव्वा कोटी रुपयांचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

सांगलीसह आठ बँकांनी याबाबत वारंवार केंद्राकडे पाठपुरावा केला. पण त्यांना यश आले नाही.

अखेर याप्रकरणी संबंधित बँकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. या जुन्या चलनातील नोटा अद्याप संबंधित बँकांकडे पडून आहेत. मात्र, त्यावरील विमा, देखभालीचा खर्च यासाठी बँकांना आतापर्यंत कोटींचा खर्च आलेला आहे. अजूनही केंद्र शासन व आरबीआय या नोटा कधी स्वीकारणार याची शाश्वती नाहीत. सध्या ही रक्कम बँका ताळेबंदात शिलकीला दाखवत आहे. मात्र, त्यावर व्याज बुडत असून जिल्हा बँकेला तोटा होत आहे.

जुन्या नोटा असलेल्या जिल्हा बँका व रक्कम

पुणे जिल्हा बँक 22.25 कोटी
कोल्हापूर जिल्हा बँक 25.27 कोटी
सांगली जिल्हा बँक 14.72 कोटी
नाशिक जिल्हा बँक 21.32 कोटी
अहमदनगर जिल्हा बँक 11.68
वर्धा जिल्हा बँक 78.61 लाख
नागपूर जिल्हा बँक 5 कोटी
अमरावती जिल्हा बँक 11 लाख
एकूण 101.18 कोटी

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *