rajkiyalive

sangli crime news : नशेचे इंजेक्शन पुरवणारा मुख्य वितरक पोलिसांच्या रडारवर : नशा करणार्‍यांकडे होणार चौकशी.

sangli crime news : नशेचे इंजेक्शन पुरवणारा मुख्य वितरक पोलिसांच्या रडारवर : नशा करणार्‍यांकडे होणार चौकशी. : सांगली : नशेसाठी वापरण्यात येणार्‍या इंजेक्शन साठा प्रकरणातील मुख्य वितरक आता पोलिसांच्या रडारवर असून त्याचा शोध घेतला जात आहे. तसेच नशा करणार्‍यांची माहिती घेवून त्यांच्याकडे चौकशी केली जाणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, आज काही संशयितांकडे महात्मा गांधी पोलिसांनी चौकशी केली असून वीस एक जणांची यादी पोलिसांसमोर आली आहे. लवकरच धक्कादायक माहिती समोर येईल, असे पोलिस सुत्रांकडून समजते आहे.

sangli crime news : नशेचे इंजेक्शन पुरवणारा मुख्य वितरक पोलिसांच्या रडारवर : नशा करणार्‍यांकडे होणार चौकशी.

मेफेनटर्माइन इंजेक्शन, गोळ्या साठा व विक्री करणार्‍या तिघांकडे पोलिस कोठडी कसून चौकशी सुरू आहे. शरिरसौष्ठवसाठी याचा वापर प्रामुख्याने केला जात असल्याचे तपासात समोर आले आहे. नशेखोरीविरोधात पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार गांजा, नशेच्या गोळ्यांसह मेफेड्रोन सारखे ड्रग्ज पोलिसांनी जप्त केले. वैद्यकीय वापरासाठी असलेल्या इंजेक्शनचा वापर बेकायदेशीरीत्या नशा करण्यासाठी होत असल्याची माहिती महात्मा गांधी पोलिसांना मिळाली.

त्याननुसार सांगलीतील एका उद्यानाच्या मागील बाजूस नशेसाठी वापरण्यात येणार्‍या औषधांची बेकायदा विक्री करण्यासाठी दोघे आले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे नशेकरिता वापरत असलेल्या मेफेनटर्माइन इंजेक्शनच्या 51 बाटल्या आढळल्या. त्यानुसार रोहित कागवाडे आणि ओंकार मुळे यांना ताब्यात घेतले. दोघा संशयितांकडे पोलिसांनी कसून चौकशी केली. औषध विक्रेता आशपाक पटवेगार याच्याकडून इंजेक्शन घेतल्याची कबुली दिली.

पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले. सांगली पोलिसांनी प्रथमच इतकी मोठी कारवाई करत नशेखोरीला दणका दिला आहे. याप्रकरणातील प्रमुख वितरक आता पोलिसांच्या रडारवर आहेत. त्याला लवकरच ताब्यात घेतले जाणार आहे.

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज