jayant patil news : राजारामबापू पुण्यतिथीनिमित्त 68 प्राथमिक आरोग्य केंद्रात स्मृती आरोग्य कार्यक्रमांचे आयोजन : प्रतिक पाटील : लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या स्मरणार्थ राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना व सांगली जिल्हा परिषदे च्या आरोग्य विभागाच्या वतीने सांगली जिल्ह्यातील 68 प्राथमिक आरोग्य केंद्रात लोकनेते राजारामबापू पाटील स्मृती आरोग्य कार्यक्रम राबविला जात आहे. आज दि.24 रोजी कामेरी (ता वाळवा), सांगाव (ता. शिराळा) येथे या आरोग्य कार्यक्रमांतर्गत आरोग्य शिबीरे होत आहेत. या शिबीरांचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा,असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांनी केले आहे.
jayant patil news : राजारामबापू पुण्यतिथीनिमित्त 68 प्राथमिक आरोग्य केंद्रात स्मृती आरोग्य कार्यक्रमांचे आयोजन : प्रतिक पाटील
ते म्हणाले, 25 जानेवारी-पाचगणी, शिरशी, 27 जानेवारी-पेठ,भिलवडी,28 जानेवारी-येडे मच्छिंद्र,मोहिते वडगाव,29 जानेवारी- नेर्ले, मांगले,30 जानेवारी-बोरगाव, चरण,31 जानेवारी-चिकूर्डे,खंडेराजूरी,3 फेब्रुवारी- कवठेपिरान,4 फेब्रुवारी-आरग,म्हैसाळ,5 फेब्रुवारी-एरंडोली,भोसे,6 फेब्रुवारी-कवला पूर,नांद्रे,7 फेब्रुवारी- नेवरी,आळसंद, 8 फेब्रुवारी- आटपाडी,देवराष्ट्रे,9 फेब्रुवारी- ढालगाव,10 फेब्रुवारी-देशिंग,रांजणी,11 फेब्रुवारी- नागज,आगळगांव,12 फेब्रुवारी- बोरगाव (ता.),येळावी,13 फेब्रुवारी- मांजर्डे, चिंचणी,14 फेब्रुवारी-वायफळे,हातनूर,15 फेब्रुवारी-मणेराजूरी, सावळज,16 फेब्रुवारी- कासेगाव,17 फेब्रुवारी-दिघंची,हिंगणगाव,18 फेब्रुवारी-वेजेगांव,खेराडेवांगी, 20 फेब्रुवारी- करघणी,वांगी, 21 फेब्रुवारी-खानापूर,लेंगरे, 22 फेब्रुवारी-येळावी,24 फेब्रुवारी-संख, को.बोबलाद,25 फेब्रुवारी-उमदी,वळसंग,27 फेब्रुवारी-डफळापूर,शेगांव,28 फेब्रुवारी- बिळूर,मुचंडी
या शिबिरांत तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत सर्वरोग तपासणी व प्राथमिक उपचार केले जाणार आहेत. या शिबिरात रोग निदान झालेल्या रुग्णांच्यावर पुढील उपचार करण्या साठी महात्मा फुले व शासकीय आरोग्य योजना अंतर्गत संदर्भ पत्र जागेवरच दिले जाणार आहे. मोफत रक्त,लघवी,रक्तदाब तपासणी केली जाणार असून जरुरीप्रमाणे रक्त साखर व ईसीजी घेतला जाणार आहे. ऍनिमिया रुग्णांना 50 दिवसांच्या टॉनिक गोळ्या,जंत ता वरच्या गोळ्या मोफत दिल्या जाणार आहेत. अधिक माहिती साठी डॉ.प्रकाश म्हाळुंगकर मो.क्र.9970900700 यांच्याशी संपर्क करावा,असे आवाहन केलेले आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.