आरोपींचा थरारक पाठलाग करत पोलिसांनी केले जेरबंद
islampur murdar news : इस्लामपूरात युवकाचा चाकूने भोकसून खून : तिघांना अटक : इस्लामपूर-यल्लाम्मा चौक येथे पुर्वीच्या भांडणाचा राग मनात धरुन गौरव हेमंत कुलकर्णी (वय 24, रा.गणेश मंडईजवळ, इस्लामपूर) याच्यावर चाकूने भोकसून खून केल्याची घटना सोमवारी रात्री 10.30 च्या सुमारास घडली. याप्रकरणी सौरभ सुशिल पाटील (रा.यल्लाम्मा चौक, इस्लामपूर), साजिद जहागीर इनामदार (रा.गोटखिंडी, ता.वाळवा), विजय उर्फ सोन्या धुलुगडे (रा. इस्लामपूर, ता.वाळवा) या तिघा आरोपींचा थरारक पाठलाग करुन पोलिसांनी कामेरी ता.वाळवा येथे जेरबंद केले.
islampur murdar news : इस्लामपूरात युवकाचा चाकूने भोकसून खून : तिघांना अटक
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती, इस्लामपूर पोलीस ठाण्याचे पो.नि.संजय हारुगडे, सपोनी सागर वरुटे, पोउपनि समाधान घुगे, पोउपनि श्रीकांत वासुदेव, पोहेकॉ अरुण कानडे, पोकॉ अमोल सावंत, दिपक घस्ते, शशीकांत शिंदे, विशाल पांगे, इम्रान रोडे, सुशांत बुचडे असे पोलीस पथक ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत होते.
त्यावेळी बातमीदारामार्फत यल्लाम्मा चौक येथे काही इसमांनी एक युवकावर चाकुने हल्ला केल्याची माहीती मिळाली. तात्काळ पोलीस पथकाने यल्लाम्मा चौक येथे धाव घेतली. त्यावेळी एक युवक जखमी अवस्थेत दिसुन आला. गौरव हेमंत कुलकर्णी असे नाव समजले. घटनास्थळावरुन सौरभ पाटील, साजिद इनामदार, विजय धुलुगडे अशी आरोपीची नावे निष्पण्ण झाली. त्यानंतर गौरव हेमंत कुलकर्णी उपचारापुर्वी मयत झाला. पोलिसांनी तात्काळ आरोपींचा ठावठिकाणाची माहीती घेण्यास सुरुवात केली. आरोपी कामेरी गावातुन कोल्हापुरकडे जाणार असल्याची खात्रीशीर माहीती पोलिसांना मिळाली.
पो.नि.संजय हारुगडे यांनी तात्काळ पोलीस पथकासह कामेरी गावाकडे धाव घेतली.
कामेरी येथे शेताकडेला सौरभ पाटील, साजिद इनामदार, विजय धुलुगडे हे उभा असलेले दिसले. पो.नि.संजय हारुगडे, अमोल सावंत, शशिकांत शिंदे, दिपक घस्ते, विशाल पांगे यांनी गाडीतुन उतरुन आरोपींना ताब्यात घेण्यासाठी गेले. त्यावेळी आरोपींनी झटापट करुन शेतात पळुन जाण्याचा प्रयत्न केला. आरोपींना ऊसाच्या शेतामध्ये थरारक पाठलाग करुन पकड्यात यश आले. त्यांना अटकाव करताना झालेल्या झटापटीत पो.नि.संजय हारुगडे व अमोल सावंत यांना दुखापत झाली.याबाबतची फिर्याद हेमंत कुलकर्णी यांनी दिली आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत. गौरव कुलकर्णी हा फोटोग्राफीचा व्यवसाय करत होता. त्याच्या पश्चात वडील, आई, भाऊ असा परिवार आहे.
सराईत गुन्हेगारावर तिसरा खुनाचा गुन्हा
आरोपी सौरभ पाटील याच्यावर यापुर्वी दोन खुनाचे गुन्हे तसेच गंभीर दुखापतीचे गुन्हे दाखल आहेत. त्या गुन्ह्यामध्ये तो जामीनावर बाहेर आहे. जामीनावर बाहेर असताना आणखी एका खुनाच्या गुन्ह्याची भर पडली आहे. आरोपींना जेरबंद करुन घटनास्थळी आणले होते. त्यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.
तक्रार एकाची मृत्यू दुसर्याचा
गौरव कुलकर्णीचा मित्र जुबेरने सौरभ पाटीलच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली होती. त्याचा राग सौरभच्या मनात होता. सोमवारी रात्री जुबेर व गौरव सोबत होते. त्यांना थांबवून सौरभसह तिघांनी हल्ला केला. त्यात गौरवचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.