sangli sugar news : जिल्ह्यातील पंधरा कारखान्यांचे 48.54 लाख क्विंटल साखर उत्पादन, सोनहिरा कारखाना गाळपात आघाडीवर

SHARE:

ऊस हंगाम अर्ध्यावर, 48 लाख में टन गाळप

sangli sugar news : जिल्ह्यातील पंधरा कारखान्यांचे 48.54 लाख क्विंटल साखर उत्पादन, सोनहिरा कारखाना गाळपात आघाडीवर : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम निम्म्यावर आला आहे. 18 साखर कारखान्यांपैकी 15 साखर कारखान्यांनी गेल्या दोन महिन्यांत 48 लाख 13 हजार 572 टन उसाचे गाळप करून 48 लाख 54 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. गाळपात वांगीचा सोनहिरा साखर कारखाना तर उतार्‍यात वाळव्याचा हुतात्मा साखर कारखाना आघाडीवर आहे. सततचा पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे उसाची पुरेशी वाढ झाली नाही. तसेच जिल्ह्यातील उसाच्या क्षेत्रातही 20 टक्के घट झाली आहे. यामुळे सर्वच कारखानदारांना गळीत हंगाम मार्चपर्यंत चालवणे अवघड असल्याचे चित्र दिसून येत आहे.

sangli sugar news : जिल्ह्यातील पंधरा कारखान्यांचे 48.54 लाख क्विंटल साखर उत्पादन, सोनहिरा कारखाना गाळपात आघाडीवर

यंदाचा साखर कारखान्यांच्या गाळप हंगाम नोव्हेंबरच्या मध्यावधीत सुरु झाला. या कालावधीत विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु होती. राज्य सरकारने 1 नोव्हेंबरपासून साखर कारखाने सुरु करण्यास परवानगी दिली होती, मात्र निवडणुकीमुळे ऊसतोड मजूर वेळेत आले नाहीत. त्यामुळे कारखान्यांनी 15 नोव्हेंबरपासून गाळप सुरु केले, उपलब्ध मजूर आणि तोडणी मशीनच्या सहाय्याने गाळप चालू आहे. डिसेंबरपासून जिल्ह्यातील कारखान्यांचे जोमाने गाळप सुरु झालेे. मान्सून आणि परतीचा मान्सून दोन्ही पाऊस जिल्ह्यात धोधो कोसळले. त्यानंतरही बराच काळ ढगाळ हवामान राहिले. या सर्व वातावरणातील बदलामुळे उसाची पुरेशी वाढ झाली नाही.

जिल्ह्यात 2023-24 च्या गळीत हंगामात एक लाख 44 हजार 127 हेक्टर क्षेत्र होते.

यामध्ये सात हजार हेक्टर क्षेत्राने घट होऊन 2024-25 च्या गळीत हंगामामध्ये एक लाख 37 हजार 104 हेक्टर झाले आहे. या सर्वांचा जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या गळीत हंगामावर परिणाम झाला आहे. जिल्ह्यातील एकूण 19 साखर कारखान्यांपैकी 15 साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू झाले आहेत. या कारखान्यांनी 48 लाख 73 हजार 572 टन उसाचे गाळप झाले असून 49 लाख 8 हजार 444 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.

या कारखान्यांचा साखर उतारा 11 ते 12.88 टक्क्यांपर्यंत राहिला आहे.

सर्वच कारखान्यांनी गळित हंगाम सुरु करून दीड ते दोन महिने झाले आहेत. ऊस पुरेसा उपलब्ध नसल्यामुळे कारखान्यांचे गळित हंगाम 15 मार्च 2025 पर्यंतच चालतील, असे साखर उद्योगातील तज्ञांचे मत आहे. जवळपास 8 ते 10 लाख टनाने उसाचे गाळप घटण्याचाही जाणकारांचा अंदाज आहे.

राजारामबापू कारखान्याच्या चार शाखांनी आतापर्यंत साडेआठ लाख टन उसाचे गाळप करून नऊ लाख 36 हजार 180 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. सोनहिरा कारखान्याने गाळपात आघाडी घेतली असून पावणेसहा लाख टन उसाचे गाळप केले आहे. वाळवा येथील हुतात्मा साखर कारखाना उतार्‍यात आघाडीवर आहे. त्यानंतर क्रांती, वसंतदादा, सद्गुरु श्री श्री शुगर, उदगिरी शुगर, विश्वासराव नाईक, मोहनराव शिंदे, दालमिया या कारखान्यांनीही गळित हंगामाला गती दिली आहे.

अतिवृष्टी आणि ढगाळ हवामानामुळे उसाच्या उत्पादनात घट येणार आहे.

तसेच उसाचे क्षेत्रही जवळपास 10 हजार हेक्टरपर्यंत जिल्ह्यात घटले आहे, यामुळे ऊस उपलब्ध करण्यासाठी सर्वच कारखान्यांची धावपळ सुरू झाली आहे. म्हणूनच जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे 15 मार्चपर्यंतच गळीत हंगाम चालणार आहेत. जिल्ह्यातील कारखान्यांचे आठ लाख टनापर्यंत गाळप कमी होईल, असा अंदाज साखर तज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

 

जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे गाळप
साखर कारखाना गाळप (लाख टन) उत्पादन (लाख क्विंटल)
श्री दत्त इंडिया 5.01 5.12
राजाराबापू साखराळे 3.64 3.90
विश्वासराव नाईक 3.04 3.52
राजारामबापू वाटेगाव 2.65 2.98
डॉ. पतंगराव कदम 6.12 6.52
जी. डी. बापू लाड 5.73 5.89
राजारामबापू (सर्वोदय) 1.83 2.05
मोहनराव शिंदे 2.51 2.72
दालमिया (निनाईदेवी) 2.75 3.20
भारती शुगर्स 1.19 1.34
केन अ‍ॅग्रो 1.15 1.34
उदगिरी शुगर 3.52 3.74
सद्गुरु श्री श्री 3.54 2.45
श्रीपती शुगर 2.51 2.60

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *