sangli vita drugs news : विट्यात 30 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त

SHARE:

तीन युवकांना अटक ; पाच दिवस कोठडी

sangli vita drugs news : विट्यात 30 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त: येथील कार्वे (ता. खानापूर) औद्योगिक वसाहतीत असलेल्या रामकृष्ण हरी माऊली इंडस्ट्रीजवर छापा टाकून 29 कोटी 73 लाख 55 हजार 200 रूपयांचे एमडी ड्रग्ज जप्त केले. याप्रकरणी रहुदिप धानजी बोरिया ( वय 41, उत्तीयादरा कोसंबा, जि. सुरत, गुजरात), सुलेमान जोहर शेख ( वय 32, मुंबई ), बलराज अमर कातारी ( वय 24, साळशिंगे रोड, विटा ) या संशयित आरोपींना ताब्यात घेऊन अटक केल्याची माहिती पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

sangli vita drugs news : विट्यात 30 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त

दरम्यान, या तीन संशयितांना विटा न्यायालयात हजर केले असता त्यांना 1 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई सोमवारी रात्री पावणेआठच्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीच्या पथकाने केली. याबाबत पोलिस सागर गिरीजापती टिंगरे यांनी विटा पोलिसांत फिर्याद दिली.

येथील विटा – सांगली रस्त्यालगत असणार्‍या औद्योगिक वसाहतीत कच्च्या साहित्यांच्या सहाय्याने मशिनद्वारे मेफॉड्रॉन (एमडी ) तयार केले जात असल्याची माहिती सांगलीच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांनी त्यांच्या टीमसह सोमवारी रामकृष्ण हरी माऊली इंडस्ट्रीजमध्ये मेफॉड्रॉन ( एमडी ) तयार केले जात असलेल्या ठिकाणी छापा टाकला. त्यात 29 कोटी 73 हजार 55 हजार 200 रूपयांचे तयार एम. डी. ताब्यात घेतला. तसेच संशयित रहुदिप धानजी बोरिया ( वय 41, उत्तीयादरा कोसंबा, जि. सुरत, गुजरात राज्य ), सुलेमान जोहर शेख ( वय 32, मुंबई ), बलराज अमर कातारी ( वय 24, साळसिंगे रोड, विटा ) यांना ताब्यात घेतले.

याबाबत पोलिस अधीक्षक संदीप घुगे म्हणाले, यातील संशयित रहुदिप बोरिचा हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याचे बीएससी केमेस्ट्री शिक्षण झाले आहे. त्यास केमीकल प्रॉडक्शन बाबत चांगली माहिती आहे. गेल्या एक महिन्यापासून रहुदिप बोरिचा, बलराज कातारी व सुलेमान शेख यांनी कार्वे (ता. खानापूर ) गावच्या हद्दीत असलेल्या विटा येथील एकाचा प्लॉट नंबर 43 मधील कारखाना 30 हजार रुपये प्रति महिना भाडयाने घेतला आहे. त्याबाबत त्यांच्यात अद्याप कोणताही करार झाला नाही.

त्या ठिकाणी रहुदिप बोरिचा व सुलेमान शेख तेथे असणा-या कच्च्या साहित्यांच्या सहाय्याने मशिनद्वारे मेफॉड्रॉन ( एमडी ) माल तयार करीत होते. तो माल विक्रीकरीता बलराज कातारी हा बाहेर घेऊन जात असल्याची माहिती मिळाली होती. वरील तीन संशयितांना सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज पवार व पथकाने मुद्देमालासह ताब्यात घेतले. या गुन्ह्याचे धागेदोरे शोधण्याचे काम सुरू आहे. यामध्ये अजून आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता असल्याचे श्री. घुगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

ही कारवाई कोल्हापुर परिक्षेत्रचे विशेष पोलास महानिरीक्षक सुनिल फुलारी, पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलिस अधीक्षक रितु खोखर, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, विटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे, पंकज पवार, सिकंदर वर्धन, अच्युत सुर्यवंशी, सागर टिंगरे, संदीप गुरव, अमोल पैदाळे, नागेश खरात, मच्छिंद्र बर्डे, दरीबा बंडगर, सागर लवटे, अनिल कोळेकर, उदय साळुंखे, इम्रान मुल्ला, नागेश कांबळे, संजय पाटील, अमर नरळे, सतिश माने, महादेव नागणे, संदीप नलवडे, उदय माळी, अनंत कुडाळकर, विक्रम खोत, प्रमोद साखरपे, सुनिल जाधव, गणेश शिंदे यांनी केली.

अंमली पदार्थांची माहिती देण्याचे आवाहन

शासनाने बंदी घातलेला व मानवी जीवनावर परिणाम करणारा कोणत्याही अंमली पदार्थांची कोणी विक्री, तस्करी, साठा व उत्पादन करीत असेल तर त्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा सांगली, जिल्हा नियंत्रण कक्ष सांगली किंवा संबंधित पोलीस ठाण्यास द्यावी. असे आवाहन स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलिस निरीक्षक
सतिश शिंदे यांनी केले आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *