rajkiyalive

sangli pestiside news : एस. के. ऍग्रो सायन्सेस’वर गुन्हा दाखल

ग्रेप मास्टर’ संजीवकाचा दुष्परिणाम प्रकरणी कारवाई : रवींद्र देशमुख यांच्या पाठपुराव्यास यश

sangli pestiside news : एस. के. ऍग्रो सायन्सेस’वर गुन्हा दाखल : एस. के. ऍग्रो सायन्सेस या कंपनीचे ’ग्रेप मास्टर’ हे संजीवक वापरल्यामुळे खुजगाव (ता. तासगाव) येथील रवींद्र देशमुख यांच्या द्राक्ष बागेचे नुकसान झाले होते. याप्रकरणी संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करावा, यासाठी गेल्या सव्वा वर्षांपासून देशमुख यांचा पाठपुरावा सुरू होता. त्यांच्या पाठपुराव्यामुळे आज एस. के. ऍग्रो सायन्सेस या कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला.

sangli pestiside news : एस. के. ऍग्रो सायन्सेस’वर गुन्हा दाखल

खुजगाव येथील रवींद्र देशमुख या शेतकर्‍याने एस. के. ऍग्रो सायन्सेस या कंपनीचे ग्रेप मास्टर हे संजीवक आपल्या द्राक्ष बागेवर फवारले होते. या संजीवकाच्या फवारणीनंतर देशमुख यांच्या द्राक्ष बागेचे मोठे नुकसान झाले. या संजीवकाचा द्राक्ष बागेवर दुष्परिणाम झाल्याचे आढळून आले.

याप्रकरणी देशमुख यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली होती. कृषी विभागाने देशमुख यांच्या द्राक्ष बागेची पाहणी केली. त्यावेळी नुकसान झालेल्या बागेचा पंचनामा करण्यात आला. शिवाय ग्रेप मास्टरच्या मोकळ्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.

त्यानंतर कृषी विभागाने एस. के. ऍग्रो सायन्सेस ही कंपनी नेमकी कुठे आहे, त्याचे उत्पादन कुठे होते, त्याचा परवाना आहे का, याबाबत माहिती घेतली. मात्र कृषी विभागाला कोणतीही माहिती मिळून आली नाही. त्यामुळे कृषी विभागाने याप्रकरणी एस. के. ऍग्रो सायन्सेस या बोगस कंपनीवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी देशमुख यांनी केली.

गेल्या सव्वा वर्षांपासून ते याबाबत पाठपुरावा करीत आहेत. मात्र कृषी विभागाच्या अधिकार्‍यांकडून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ केली जात होती. शिवाय तासगाव पोलीसही सुरूवातीच्या काळात गुन्हा दाखल करून घेत नव्हते. तद्नंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करता येतो का, याबाबत सरकारी वकिलांकडे कायदेशीर मत मागितले. याप्रकरणी गुन्हा दाखल करता येतो, असे मत सरकारी वकिलांनी नोंदवले.

त्यानंतर पोलिसांनी तालुका कृषी अधिकारी अनिल फोंडे यांना पत्र पाठवून गुन्हा दाखल करण्यासाठी अधिकारी प्राधिकृत करा, असे सांगितले. मात्र देशमुख यांच्या बागेतून जप्त केलेल्या ग्रेप मास्टरच्या बाटल्या तत्कालीन कृषी अधिकारी सर्जेराव अमृतसागर यांच्याकडे होत्या. त्यांनी या बाटल्या तासगाव कृषी कार्यालयाकडे जमा केल्या नाहीत. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यामध्ये दिरंगाई होत होती. पोलीस व कृषी विभागाकडून गुन्हा दाखल करण्यासाठी चालढकल होत असल्याने रवींद्र देशमुख यांनी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.

त्यामुळे पोलिसांसह कृषी विभाग धास्तावला होता. अखेर कृषी विभागाने आज एस. के. ऍग्रो सायन्सेस या कंपनीवरती गुन्हा दाखल केला. त्यामुळे गेल्या सव्वा वर्षांपासून या कंपनीवर गुन्हा दाखल करण्यासाठी सुरू असणारा देशमुख यांचा संघर्ष फळाला आला आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज