sangli kupwad murdar news : कुपवाड एमआयडीसीमध्ये परप्रांतिय कामगाराचा खून : दोघे ताब्यात : एमआयडीसी मधील एका कारखान्यात ’जेवण उशीरा का बनविले’ या कारणावरून परप्रांतीय मजुराचा लाकडी दांडक्याने जबर मारहाण करून खून केल्याची घटना मंगळवार मध्यरात्री घडली. इद्रेश गौरीशंकर यादव, (वय 23 वर्ष, मूळ रा. शाहुपुर, उत्तर प्रदेश, सद्या (रा. एमआयडीसी कुपवाड)असे खून झालेल्या मजुराचे नाव आहे. याप्रकरणी वैभव सहदेव कांबळे,( वय 21 , चिदानंद उर्फ संतोष मायाप्पा खोत ( वय 22 वर्ष, रा.दोघे मूळ सलगर ता. मिरज,सद्या दोघेही रा. कुपवाड ) यांना ताब्यात घेतले आहे.रात्री उशीरा पर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम कुपवाड पोलिस ठाण्यात सुरू होते.
sangli kupwad murdar news : कुपवाड एमआयडीसीमध्ये परप्रांतिय कामगाराचा खून : दोघे ताब्यात
याबाबत अधिक माहिती अशी की, कुपवाड एम आय डी सी मध्ये एका कारखान्यात खाजगी ठेकेदरकडून फॅब्रिकेशनचे काम सुरू आहे.
मयत इद्रेश यादव हा ठेकेदार दिलीप राऊत यांच्या मुकादम दिगंबर कांबळे यांच्याकडे काही दिवसांपासून तो कामास होता. एमआयडीसीतील कारखान्यात फॅब्रिकेशनच्या कामासाठी इद्रिस यादव, वैभव कांबळे, चिदानंद उर्फ संतोष खोत व अजय पटेल हे चौघेजण आले होते. चौघांना कारखान्यात दोन खोल्या राहण्यासाठी देण्यात आल्या होत्या. मंगळवार (ता.28) रात्रीच्या सुमारास परप्रांतीय कामगार इद्रेश यादव याने जेवण उशीरा का बनविले,
चपाती भाजली गेली नाही या कारणावरून वैभव कांबळे, चिदानंद उर्फ संतोष खोत यांनी विचारणा केली
यातून वाद निर्माण झाला. या वादावादीत मयत यादव याने शिवीगाळ केली या रागातून वैभव कांबळे ,चिदानंद उर्फ संतोष खोत या दोघांनी इद्रिसला शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने हात, पाय डोक्याला जबर मारहाण केली. या मारहणीत इद्रेश यादव याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस निरीक्षक रितू खोखर, मिरज पोलीस उपअधीक्षक प्रणील गिल्डा, कुपवाड पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरिक्षक दिपक भांडवलकर, उपनिरीक्षक विश्वजीत गाडवे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली.
पोलीस अधिक्षक संदीप घुगे यांनी घटनास्थळी पाहणी करून तपासणीच्या अनुषंगाने सूचना केल्या.पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. अवघ्या काही तासातच कुपवाड पोलिसांनी दोघा संशयिताना ताब्यात घेतले असून अजून कोणाचा सहभाग आहे का याचा शोध पोलीस घेत आहेत.या घटनेचा अधिक तपास सहा.पो. नि. दीपक भांडवलकर करित आहेत.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.