rajkiyalive

sangli news : ‘डीपीडीसी’मधील 20 विशेष निमंत्रितांच्या नियुक्त्या रद्द

आ. गाडगीळ, देशमुख, बाबर, माजी आमदार जगताप, भीमराव माने यांचा समावेश

sangli news : ‘डीपीडीसी’मधील 20 विशेष निमंत्रितांच्या नियुक्त्या रद्द: राज्यातील जिल्हा नियोजन समित्यांवरील (डीपीडीसी) नामनिर्देशित सदस्य व विशेष निमंत्रित सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या. त्यानुसार सांगली जिल्ह्यातील विशेष निमंत्रित 12, विधी मंडळ सदस्य एक, नियोजनचे ज्ञान असलेले दोन आणि पाच निमंत्रित सदस्य अशा 20 सदस्यांची नियुक्ती रद्द करण्याची कार्यवाही जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केली आहे.

sangli news : ‘डीपीडीसी’मधील 20 विशेष निमंत्रितांच्या नियुक्त्या रद्द

त्यामध्ये आ. सुधीर गाडगीळ, आ. सत्यजित देशमुख, आ. सुहास बाबर, विलासराव जगताप, भीमराव माने यांचा समावेश आहे. आता नवीन सदस्यांच्या नियुक्त्या पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून केल्या जाणार आहेत.

जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजाला साहाय्य करण्यासाठी समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री सांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समिती असते. जिल्हा नियोजन समितीवर विधानमंडळ किंवा संसद सदस्य यातून दोन, तर जिल्हा नियोजनाचे ज्ञान असलेले चार आणि विशेष निमंत्रित म्हणून 14 अशा एकूण 20 सदस्यांची नियुक्ती राज्य शासनाकडून केली जाते. यामधून कार्यकारी समितीवर 2 नामनिर्देशित आणि 2 विशेष निमंत्रित सदस्यांची नियुक्ती केली जाते. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. त्यानंतर नव्याने पालकमंत्र्यांच्या नियुक्त्याही करण्यात आल्या आहेत.

महायुती सरकारकडून राज्यातील सर्व जिल्हा नियोजन समित्यांवर अशा सर्व नामनिर्देशित सदस्य व विशेष निमंत्रित सदस्यांची राज्य शासनाकडून करण्यात आलेल्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. नवीन पालकमंत्री म्हणून चंद्रकांतदादा पाटील यांची नियुक्त झाली आहेत, त्यामुळे आता त्यांच्या शिफारसीने नव्या सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे.

संसद सदस्यांमधून आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हा नियोजनासंबंधी ज्ञान असलेले सदस्य माजी आमदार विलासराव जगताप, शिवसेना शिंदे गट जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार, विशेष निमंत्रित सदस्य आ. सत्यजित देशमुख, आ. सुहास बाबर (गार्डी, शिवसेना शिंदे गट) जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख (कडेपूर, भाजप), जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भीमराव माने (कवठेपिरान, शिवसेना शिंदे गट), पोपट कांबळे (मिरज, आठवले गट), विनायक जाधव (कसबे डिग्रज, रयत क्रांती) व जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील (आटपाडी, शिवसेना शिंदे गट) तसेच समित कदम (जनसुराज्य शक्ती), सुनिल पाटील (विसापूर ता. तासगाव), राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण सरगर, अजितदादा गटाचे माजी नगरसेवक अतहर नायकवडी आणि बिरेंद्र थोरात यांच्यासह अन्य सदस्यांच्या निवडी रद्द झाल्या आहेत.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज