एशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होणार
sangli chandranamaskar news : सांगलीत पार पडणार महिलांचा जागतिक ‘चंद्र नमस्कार योग’ उपक्रम : कबड्डीसाठी देशभर ख्याती मिळवलेले तरुण भारत व्यायाम मंडळ, सांगली आणि अॅबसुल्युट फिटनेस सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांचा ’चंद्र नमस्कार’ हा योग कार्यक्रम रविवार, दि. 9 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता तरुण भारत व्यायाम मंडळाच्या भव्य स्टेडियमवर आयोजित केला आहे. या उपक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होणार आहे, अशी माहिती तरुण भारत व्यायाम मंडळाचे अध्यक्ष महेश पाटील आणि अॅबसुल्युट फिटनेस सेंटरच्या संचालक अर्चना कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
sangli chandranamaskar news : सांगलीत पार पडणार महिलांचा जागतिक ‘चंद्र नमस्कार योग’ उपक्रम
ते म्हणाले, तरुण भारत व्यायाम मंडळाने कबड्डी, शरीरसौष्ठव, कुस्ती, रिंगटेनिस, स्केटींग, योगासन यासह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे यशस्वी संयोजन केले आहे. अनेक क्रीडा प्रकारासाठी या संस्थेचे मोठे योगदान लाभले आहे. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू या संस्थेने देशाला दिलेले आहेत. 1930 ला स्थापन झालेल्या या संस्थेला आता 95 वर्षे पूर्ण झाली आहेत. ही संस्था शताब्दी महोत्सवाकडे वाटचाल करत आहे.
याचाच एक भाग म्हणून चंद्र नमस्कार योग कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. जगातला हा पहिला उपक्रम आहे आणि तो सांगलीत होत आहे. चंद्र नमस्कार हा प्राचीन हिंदू संस्कृतीतील एक सुंदर योग प्रकार आहे. त्याचा प्रसार आणि प्रचार होण्याच्या दृष्टिकोनातून महिलांच्या सामुहिक चंद्र नमस्कार उपक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये 1200 महिलांचा सहभाग असेल. यावेळी हजारो नागरिकांचीही उपस्थिती असेल. या उपक्रमाची तरुण भारत स्टेडियमवर जय्यत तयारी करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे.
इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होण्यासाठी जे काही नियम आहेत त्याची सर्व ती तयारी झाली आहे. सायंकाळच्या शांत वातावरणात आणि चंद्राच्या शीतल प्रकाशात तसेच उत्तम संगीताच्या तालावर होणार्या या उपक्रमाला हजारोंच्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे. यावेळी प्रमोद जगताप, प्रमोद सूर्यवंशी, राजू पाटील, राजाराम भोसले, अशोक चव्हाण, भास्कर कुलकर्णी, विशाल सुतार, अनुप पाटील, रोनक शहा यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, खेळाडू, प्रशिक्षक उपस्थित होते.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.