सोन्यावर दुप्पट चांदी मिळविण्याची संधी
साडे तीन मुहूर्तापैकी एक महत्वाचा मुहूर्त म्हणजे अक्षय्य तृतीया. या अक्षय्य तृतीयेच्या शुभ दिनानिमित्त सोने खरेदी अत्यंत शुभ मानली जाते. याच निमित्ताने शुद्ध सोने आणि हिऱ्यांच्या दागिने खरेदीसाठीचे हक्काचे ठिकाण म्हणजेच चंदुकाका सराफ ज्वेल्स यंदाही ‘विशेष सोनेरी ऑफर्स’ घेऊन आले आहेत.
लवकरच आपल्या शुद्धतेची 200 वर्षाची परंपरा पूर्ण करणाऱ्या चंदुकाका सराफ ज्वेल्सच्या माध्यमातून यंदाचा अक्षय्य तृतीयेचा उत्सव ग्राहकांसाठी अधिक शुभ ठरणार आहे.
अक्षय् तृतीयेच्या निमित्ताने चंदुकाका सराफ ज्वेल्स यांच्या सोनेरी ऑफर्स
यंदाच्या अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने सोन्याच्या खरेदीवर दुप्पट चांदी आणि कोणत्याही डायमंड नेकलेस आणि बँगल्सवर शून्य टक्के मजुरीची खास सोनेरी ऑफर चंदुकाका सराफ ज्वेल्स घेऊन आले आहेत. यासोबतच 10 ग्रॅम व त्यापुढील सोने खरेदीवर हमखास गिफ्ट व्हाऊचर ग्राहकांना मिळणार असून यंदाची अक्षय्य तृतीया चंदुकाका सराफ ज्वेल्सच्या ग्राहकांसाठी किफायतशीर असणार आहे.
ही सोनेरी ऑफर 1 मे 2025 पर्यंत चंदुकाका सराफ ज्वेल्सच्या सर्व शाखांमध्ये सुरू राहणार असून दुप्पट चांदी ऑफर 30 ग्रॅम पुढील सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर उपलब्ध असेल, याची नोंद घ्यावी.
अक्षय्य तृतीयेच्या या पवित्र आणि शुभ दिनी सोने व हिऱ्यांच्या दागिन्यांच्या खरेदीवर सर्वोत्तम ऑफरचा लाभ ग्राहकांनी घ्यावा, असे आवाहन चंदुकाका सराफ ज्वेल्सच्या माध्यमातून करण्यात आले आहे. आपल्या शुद्धतेच्या परंपरेने दागिने खरेदीचा विश्वास कायमच वाढवणारे चंदुकाका सराफ ज्वेल्स यंदाही अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने सोनेरी ऑफर्सच्या माध्यमातून ग्राहकांचा आनंद द्विगुणीत करतील यात कुठलीही शंका नाही.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.