inamdhamni news : इनामधामणीत तीनपानी जुगार अड्ड्यावर छापा : सहा जणांवर कारवाई : मिरज तालुक्यातल्या इनामधामणी गावच्या हद्दीतील जुन्या बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर सुरु असलेल्या तीनपानी जुगार अड्ड्यावर छापा टाकून कारवाई केली. याठिकाणी जुगार खेळणार्या सहा जणांवर कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला.
inamdhamni news : इनामधामणीत तीनपानी जुगार अड्ड्यावर छापा : सहा जणांवर कारवाई
स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सोमवारी सदरची कारवाई केली. याठिकाणाहून रोकड, दुचाकी आणि रिक्षासह 2 लाख 57 हजार 980 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जुगार खेळणार्या दिग्विजय सुभाष श्रीरंबेकर (वय 26 रा. मौजेडिग्रज), महेश जिंनु बिरणे (वय 26), अक्षय राजेंद्र भोसले (वय 28), अच्युत गोपाळ नाईक (वय 36), सुहास कृष्णा कोळी (वय 33) आणि सतीश महावीर पाटील (वय 45 सर्व रा. इनामधामणी) अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत.
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जिल्ह्यातील अवैध धंदे उध्वस्त करण्याचे आदेश टास्क फोर्सच्या बैठकीत दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेशनची विविध पथके तैनात केली आहे. पथकातील कर्मचार्यांना माहिती मिळाली कि, मिरज तालुक्यातल्या इनामधामणी गावच्या हद्दीतील बत्तीस माग कारखान्याजवळ असलेल्या सम्मेद पाटील यांच्या जुन्या घराच्या पहिल्या मजल्यावर बेकायदेशीर तीनपानी जुगार अड्डा सुरु आहे.
मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्यांनी त्याठिकाणी तातडीने छापा टाकला. यावेळी संशयित सहा जण टेबलाच्या बाजूला गोलाकार करून पत्त्याचा जुगार खेळत होते. यावेळी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता दिग्विजय श्रीरंबेकर याने सांगितले कि, सदरची जागा सम्मेद पाटील यांच्या मालकीची असून ती भाडे तत्वावर श्रीरंबेकर, सागर फडतरे आणि निलेश नाईक अशा तिघांनी मिळून घेतल्याचे सांगितले. यावेळी हे तिघे मिळून याठिकाणी बेकायदेशीर जुगार अड्डा चालवत असल्याचे निदर्शनास आले.
inamdhamni-news-raid-on-three-gambling-dens-in-inamdhamni-action-taken-against-six-people
यावेळी सहा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील 2 लाख 57 हजारांचा मुद्देमाल जप्त करत पुढील कार्यवाहीसाठी सांगली ग्रामीण पोलिसांकडे सुपूर्त केले आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, उपनिरीक्षक कुमार पाटील, अरुण औताडे, संकेत मगदूम, अतुल माने, श्रीधर बागडी, सुशील मस्के, सुमित सूर्यवनाशी आणि ऋतुराज होळकर यांच्या पथकाने केली.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











