jayant patil news : बारामती येथील कृत्रिम बुद्धिमत्ताचा वापर करून केलेली शेती पाहून राजारामबापू कारखान्यातील शेतकरी प्रभावित

SHARE:

jayant patil news : बारामती येथील कृत्रिम बुद्धिमत्ताचा वापर करून केलेली शेती पाहून राजारामबापू कारखान्यातील शेतकरी प्रभावित : बारामती येथील ऍग्रीकल्चरल डेव्हल्पमेंट ट्रस्ट संचलित कृषि विज्ञान केंद्राने एआयचा वापर करून केलेली ऊस शेती पहाणे आणि महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाच्या वतीने आयोजित ऊस शेतीमध्ये एआयचा वापर कसा करायचा? या विषयावरील चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी ’राजाराम बापू’चे 35 प्रगतशील शेतकरी आणि संबंधित अधिकारी गेले होते. राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांच्या प्रोत्साहनाने या अभ्यास दौर्‍याचे नियोजन केले होते.

jayant patil news : बारामती येथील कृत्रिम बुद्धिमत्ताचा वापर करून केलेली शेती पाहून राजारामबापू कारखान्यातील शेतकरी प्रभावित

राष्ट्रीय नेते व व्हीएसआयचे अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार,व्हीएसआयच्या एआय टास्क फोर्सचे अध्यक्ष आ.जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी.आर.पाटील यांनी राज्यातील साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकर्‍यांना एआय तंत्रज्ञानाचे महत्व पटवून देण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन केले होते. या चर्चासत्रात कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ.विवेक भोईटे यांनी शेतकर्‍यांना अद्यावत माहिती दिली,तसेच यावेळी ऊस शेतीच्या प्लॉटची पाहणी करण्यात आली.

कामेरीचे सरपंच रणजित पाटील,सचिन पाटील इस्लामपूर,अमर पाटील येडे निपाणी, वैभव हाके,अजित हाके कारंदवाडी, सुलोचना कदम कुंडलवाडी,मोहन पाटील कासेगाव,रामभाऊ माळी धोत्रेवाडी,निलेश पवार रेठरेहरणाक्ष,महादेव गावडे बोरगाव, शिवाजी माने साखराळे,चंद्रकांत जाधव क.डिग्रज,कुबेर खुळे क.पिरान यांच्यासह 30 प्रगतशील शेतकरी,तसेच जलसिंचन अधिकारी जे.बी.पाटील,गटाधिकारी संग्राम पाटील,विकास कदम या अभ्यास दौर्‍या त सहभागी झाले होते.

jayant-patil-news-farmers-of-rajarambapu-factory-are-impressed-by-the-farming-done-using-artificial-intelligence-in-baramati

एआयचा ऊस शेतीमध्ये वापर ही काळाची गरज आहे. या अद्यावत तंत्रज्ञानाने ऊसाचे एकरी उत्पादन निश्चित वाढणार आहे. शेतकर्‍यांनी आपल्या शेतात एआयचा वापर करण्यासाठी आग्रही रहायला हवे,अशी भावना अभ्यास दौर्‍यात सहभागी शेतकर्‍यां नी प्रतिक्रिया दिल्या.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *