crime news :गायींची बेकायदेशीर वाहतूक करणार्‍या कसबे डिग्रजच्या युवकावर गुन्हा

SHARE:

crime news :गायींची बेकायदेशीर वाहतूक करणार्‍या कसबे डिग्रजच्या युवकास अटक : कुरुंदवाड बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जनावरांची बेकायदेशीर वाहतूक रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाने लक्ष केंद्रित केले असताना, शिरोळ तालुक्यातील औरवाड हद्दीतील गणेशवाडी ते नृसिंहवाडी रस्त्यावर महिंद्रा मॅक्सी ट्रकमधून तीन गायींची बेकायदेशीर आणि क्रूर पद्धतीने वाहतूक करताना एकाला रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी संबंधित व्यक्तीविरुद्ध कुरुंदवाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime news :गायींची बेकायदेशीर वाहतूक करणार्‍या कसबे डिग्रजच्या युवकावर गुन्हा

ही घटना दिनांक 6 जून रोजी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उदयकुमार चव्हाण (वय 26, रा. कसबे डिग्रज, ता. मिरज, जि. सांगली) याने मालवाहू महिंद्रा मॅक्सी ट्रक (एम.एच. 10 सी.डब्ल्यू. 3162) मधून दोन एच.एफ. जातीच्या गायी व एक जर्सी गाय अशी तीन गायी क्रूरतेने कोंबून वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले.

वाहन तपासणीदरम्यान पोलिसांनी एकूण 2 लाख 85 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, यामध्ये 65 हजार रुपये किंमतीच्या दोन एच.एफ. गायी, 20 हजार रुपये किंमतीची एक जर्सी गाय आणि 2 लाख रुपये किंमतीचा मॅक्सी ट्रक यांचा समावेश आहे.या प्रकरणी उदयकुमार चव्हाण याच्याविरुद्ध प्राणी संरक्षण कायदा 1960, तसेच भारतीय दंड संहिता व मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Youth from Kasbe Digraj arrested for illegally transporting cows

दरम्यान, बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जनावरांची बेकायदेशीर वाहतूक आणि कत्तल थांबवण्यासाठी शिरोळ तालुका पोलीस प्रशासन अधिक सतर्क झाले असून, ठिकठिकाणी नाकाबंदी आणि तपासणी मोहीम राबवली जात आहे. पशुवैद्यकीय अधिकार्‍यांच्या उपस्थितीत जनावरांची तपासणी केली जात असून, अशा बेकायदेशीर कृत्यांवर कठोर कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *