tasgaon news : विहीरीत पडता पडता बस वाचली येळावीत 17 प्रवासी जखमी : तासगाव तालुक्यातील येळावी गावाजवळ एसटीचा भीषण अपघात झाला. वळणावर गाडी घसरल्याने तासगाव आगाराची तासगाव-चिंचवड बस रस्त्याशेजारील नाल्यात अडकत थेट विहिरीत कोसळता कोसळता वाचली. या अपघातात बसमधील 17 प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी 3 जणांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना मंगळवारी दुपारी 1 च्या दरम्यान कराड-तासगाव रस्त्यावर घडली.
tasgaon news : विहीरीत पडता पडता बस वाचली येळावीत 17 प्रवासी जखमी
जखमी झालेल्यांमध्ये श्वेता मानकर तासगाव, प्राजक्ता मानकर तासगाव, सुमन जाधव पुणे, मनीषा शिंदे तासगाव, रायसिंग पाटील तासगाव, रेश्मा माळी तासगाव, राणी सुतार पाटण, पूजा माळी तासगाव, योगिता भोकरे कराड, अनिल मिरजकर तासगाव, सिताराम खाडे तासगाव, शालन माळी तासगाव, संदीप माळी तासगाव, मनिषा पवार धनगाव ,रविराज लोकरे कराड, शोभा मंडले मिरज व अनुराधा सातपुते तासगाव यांचा समावेश आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार तासगाव आगाराची एम एच 10 डी टी 3595 ही गाडी पुण्याहून तासगावकडे येत होती दुपारी एकच्या दरम्यान एका वळणावर मोठ्या प्रमाणात चिखल साचला होता. या चिखलामध्ये गाडीचा ब्रेक दाबूनही चालकास त्याचा अंदाज आला नाही व गाडी घसरून रस्त्यावरून खाली नाल्यात गेली. यावेळी प्रवाशांचे दैव बलवत्तर म्हणूनच रस्त्या लगत पाण्याने भरलेली विहीर होती मात्र नाल्यात गाडीची चाके अडकल्याने गाडी विहिरीच्या तोंडाशी येऊन थांबली.
अचानक झालेले या सगळ्या प्रकाराने घाबरलेल्या गाडीतल्या प्रवाशांनी एकच आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आजूबाजूच्या गावकर्यांनी व इतर वाहन धारकांनी धाव घेत गाडीतील सर्व लोकांना व जखमींना बाहेर काढले. गाडीतील जखमींना गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून त्यांना सोडण्यात आले तर उर्वरित तीन गंभीर जखमींना सांगली येथे उपचारासाठी पाठवण्यात आले.
tasgaon-news-bus-falls-into-well-17-passengers-injured
मात्र संतप्त प्रवाशांनी चालकास मारहाण केली.
या घडलेल्या घटनेनंतर तासगाव आगारातील अधिकार्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत प्रवाशांना दुसर्या गाडीने तासगाव येथे आणण्याची सोय केली. दैव बलवत तर म्हणून या घटनेत कोणतेही जीवित हानी झाली नाही मात्र एसटीचे मोठे नुकसान झाले.
ट्रॅक्टरचा चिखल बेतला असता जीवावर:
तासगाव तालुक्याच्या द्राक्ष पट्ट्यातल्या अनेक भागात शेतीसाठी औषधे मारणारे ट्रॅक्टर व शेताच्या मशागतीसाठी जाणारे ट्रॅक्टर शेतातून थेट रस्त्यावर येत असतात व त्या टायरला चिकटलेला चिखल ट्रॅक्टर सोबत अनेक फूट रस्त्यावर तसाच निघून पडतो या चिखलामुळे अनेकदा गाड्या घसरून पडत अनेक जण जखमी झाले आहेत. तालुक्यातील अनेक रस्त्यावर हीच परिस्थिती असून यामुळे अनेक गाड्या घसरण्याच्या प्रकार घडले आहेत. येळावीत एसटी घसरण्यासाठी या ट्रॅक्टरचा चिखलच कारणीभूत असून गाडीतील सर्वांच्या जीवावर बेतला असता. तरी शेतकर्यांनीही काळजी घेण्याची गरज आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.