jaysingpur news : उदगावात भानामतीचा भयंकर प्रकार!: पुरोगामी भूमी असलेल्या कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून भानामती, काळी जादूचे अनेक प्रकार सातत्याने समोर येत आहेत. शिरोळ तालुक्यातील उदगावच्या वैकुंठधाममध्येही असेच एक अघोरी कृत्य केल्याचं समोर आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून एका महिला आणि पुरुषाकडून भरदिवसा नग्न होऊन करणी, भानामतीचे प्रकार सुरू आहेत. हे सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाले आहेत. या प्रकारामुळे उदगाव आणि जयसिंगपूर परिसरात खळबळ उडाली आहे.
jaysingpur news : उदगावात भानामतीचा भयंकर प्रकार!
महिला आणि पुरुष नग्न होऊन अमावस्येला स्मशानात, चितेच्या राखेखाली बाहुली, नारळ,
जयसिंगपूर येथील एका वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर उदगाव वैकुंठधाम या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. रक्षा विसर्जनाच्या दिवशी सर्व नातेवाईक वैकुंठधाम या ठिकाणी आले. मात्र अंत्यसंस्कार केलेल्या ठिकाणी रक्षा बाजूला करून काळी बाहुली, नारळ आणि नावाची चिठ्ठी लिहून भानामतीचा प्रकार केल्याचं समोर आलं.
नग्न होऊन पुरुष-महिलेची अघोरी पूजा
या प्रकारानंतर नातेवाईकांनी उदगाव ग्रामपंचायतीकडे सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली. यामध्ये एका महिला आणि पुरुषाकडून नग्न होऊन करणी, भानामतीचा प्रकार सुरू असल्याचे समोर आला.
सीटीटीव्हीत दिसणारा पुरुष आणि महिला वेगवेगळ्या वेळी वैकुंठधाम मध्ये आल्याचं दिसून आलं. आमावस्या, पौर्णिमा, शनिवार, बुधवार दिवशी भरदिवसा ही अघोरी पूजा होत असल्याचे समोर आलं. या घटनेनंतर आता उदगाव ग्रामपंचायतीकडून तातडीने उपाययोजना करण्यात येणार आहेत.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.