atpadi crime news : कमी गुण मिळाल्याने नेलकरंजीत अल्पवयीन मुलीचा बापाकडून खून : आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथील पेाटच्या मुलीचा बापाकडून खून झाल्याची धक्काजणक घटना घडली आहे.यामध्ये साधना धोंडीराम भोसले वय.17 वर्षे रा.नेलकरंजी) हीला कॉलेजमध्ये कमी गुण मिळाली होती.त्या कारणावरुन वडील धोंडीराम भगवान भोसले यांने तिचा खून केला आहे.
atpadi crime news : कमी गुण मिळाल्याने नेलकरंजीत अल्पवयीन मुलीचा बापाकडून खून
आटपाडी तालुक्यात सदर घटनेचा शोक व्यक्त केला जात आहे.परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्ती केली.फिर्याद आटपाडी पोलिस ठाण्यात प्रिती धोंडीराम भोसले यांनी दाखल केली आहे.सदर घटना दि.20 जून रोजी घडली असून आटपाउी पोलिस ठाण्यात फिर्याद दि.22 जून रोखी दाखल करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की,साधना धोंडीराम भोलसे ही कॉलेज शिक्षण घेत होती.तिला कॉलेजमधील टेस्टमध्ये कमी गुण पडल्यामुळे वडील धोंडीराम भगवान भोसले यांने घरातील जात्याचे लाकडी खुट्टयाने संपूर्ण अंगावर वारवांर मारहाण करुन तिला गंभीर जखमी करुन तिचा खून केला आहे.
तिचा अंत्यविधी झाल्यानंतर आटपाडी पोलिस ठाण्यात प्रिति धोंडीराम भोलसे यांनी फिर्याद दाखल केली आहे.ही घटना दि.25 जून रोजी रात्री एकच्या सुमारास घडली होती.उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलिसनिरिक्षक यांनी घटना स्थळी भेट देऊन पंचमाना केला आहे.अधिक तपास पोलिस निरिक्षक विनय बहिर करीत आहेत.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.