aayrn man in sweedan : आयर्नमॅनमध्ये झळकलेलं समडोळीचं सोनेरी नाव – प्रथमेश पाटील

SHARE:

aayrn man in sweedan : आयर्नमॅनमध्ये झळकलेलं समडोळीचं सोनेरी नाव – प्रथमेश पाटील : कधी कधी एका माणसाचा प्रवास संपूर्ण गावाचं, समाजाचं आणि मातृभूमीचं मान उंचावून टाकतो. असाच एक सोनेरी क्षण घेऊन आला आहे समडोळीचा तरुण प्रथमेश राजेंद्र पाटील.

aayrn man in sweedan : आयर्नमॅनमध्ये झळकलेलं समडोळीचं सोनेरी नाव – प्रथमेश पाटील

स्वीडनच्या कलमार शहरात नुकतीच जगप्रसिद्ध ‘आयर्नमॅन’ स्पर्धा पार पडली. नावाप्रमाणेच या स्पर्धेत सहभागी होणारा प्रत्येक खेळाडू हा खर्‍या अर्थाने लोहमानव ठरतो. कारण ही स्पर्धा केवळ धावण्याची किंवा पोहण्याची नसून, शरीराची आणि मनाची खरी कसोटी असते.
3.8 किलोमीटरचे अथांग पाणी, 180 किलोमीटरचे वेगवान सायकलिंग आणि 42.2 किलोमीटरचे थकवणारे धावणे – एकूण 228 किलोमीटरचा हा प्रवास म्हणजे जीवनाच्या मर्यादांवर मात करण्याचा थरारक आव्हान!

आणि हेच आव्हान स्वीकारून समडोळीचा वारस, पद्मावती कृषी सेवा केंद्र, सांगलीचे मालक राजेंद्र पाटील (तलाठी)यांचा सुपुत्र प्रथमेश याने 12 तास 29 मिनिटांत पूर्ण करून दाखवले. त्याने 3.8 किलोमीटर पोहणे 1 तास 13 मिनिटांत, 180 किलोमीटर सायकलिंग 6 तास 9 मिनिटांत, तर 42.2 किलोमीटर मॅरेथॉन 4 तास 43 मिनिटांत पार केली.

वयाच्या केवळ 23 व्या वर्षी, 18 ते 24 या गटात भारताचा पहिला स्पर्धक म्हणून विजेतेपद पटकावत त्याने देशाचं नाव उज्ज्वल केलं. ही केवळ यशोगाथा नाही, ही तरुणाईला दिलेली प्रेरणा आहे.

त्याच्या या कर्तृत्वामागे केवळ परिश्रम नाहीत, तर असंख्य घामाचे थेंब, जिद्दीची ताकद आणि अढळ ध्येयप्रेम दडलं आहे. गावकुसाबाहेर झेपावलेला हा तरुण, जगाच्या नकाशावर समडोळी या लहानशा खेड्याचं नाव सोन्याच्या अक्षरांनी कोरून गेला आहे.
आज प्रत्येकाच्या डोळ्यांत प्रथमेशकडे पाहताना अभिमानाचे अश्रू दाटले आहेत. तो केवळ एक खेळाडू नाही, तो तरुणाईचा दीपस्तंभ आहे. जीवनात कितीही कठीण अडथळे आले, तरी जिद्द आणि श्रमांच्या बळावर आपण काय साध्य करू शकतो, याचं तो जिवंत उदाहरण आहे.

aayrn-man-in-sweedan-the-golden-name-of-the-even-skinned-man-who-appeared-in-ironman-prathamesh-patil

सध्या तो स्वीडनमध्ये एम.एस. चे शिक्षण घेत असला, तरी त्याच्या या कामगिरीमुळे तो मराठी मातीतल्या अथक जिद्दीचा प्रतीक बनला आहे.
त्याचं यश आपल्याला सांगतं -स्वप्नं मोठी बाळगा, प्रवास कितीही कठीण असो, शेवटी लोखंडाला तापल्यावरच तेज येतं!

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *