jayant patil news : जयंत दारिद्र्य निर्मुलन अभियानच्या वतीने शालेय साहित्याचेवाटप

SHARE:

jayant patil news : जयंत दारिद्र्य निर्मुलन अभियानच्या वतीने शालेय साहित्याचेवाटप:” जयंत दारिद्र्य निर्मुलन अभियानच्या वतीने उरूण इस्लामपूर येथे अनाथ विद्यार्थी- विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे युवा नेते, राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. याप्रसंगी इयत्ता १० वी,१२ वीमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सन्मान करून त्यांना भविष्यातील संधीबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.

jayant patil news : जयंत दारिद्र्य निर्मुलन अभियानच्या वतीने शालेय साहित्याचेवाटप

     प्रतिकदादा पाटील म्हणाले, आपण माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शना खाली अभियानाच्या माध्यमातून समाजातील दारिद्र्य रेषेखाली जीवन जगणाऱ्या घटकां च्यासाठी काम करीत आहोत. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील हा एक आगळा-वेगळा उपक्रम आहे. भविष्यातही समाजातील उपेक्षित घटकांच्यापर्यंत पोचून त्यांना न्याय देण्याचे काम करू. याप्रसंगी राजारामबापू ज्ञान प्रबोधिनीचे अध्यक्ष प्रा.शामराव पाटील, महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव,नेर्ले गांवचे लोकनियुक्त सरपंच संजय पाटील यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.
       राजारामबापू सहकारी बँकेचे अध्यक्ष विजयराव यादव, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, महिला राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा पुष्पलता खरात,युवक राष्ट्रवादी चे तालुका कार्याध्यक्ष देवराज देशमुख,अभियानाचे समन्वयक इलियासहुसेन पिरजादे यांच्यासह अभियान चे संघटक,विद्यार्थी-विद्यार्थिनी व पालक उपस्थित होते.
     प्रारंभी अभियानचे समन्वयक इलियास हुसेन पिरजादे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. विकास कुलकर्णी यांनी आभार मानले. संघटक सचिन मुळीक,अनिल जाधव यांनी सूत्रसंचालन केले.
Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *