jainapur railway news : जैनापूर येथे शेतकर्यांनी रेल्वेचे काम बंद पाडले: मिरज-कोल्हापूर रेल्वे लोहमार्गाच्या दोन्ही बाजूला 47.1 किलोमीटर सुरक्षा व अतिक्रमण रोखण्यासाठी ट्रॅकवर सुरक्षा जाळी बांधण्यासाठी काम सुरू करण्यात आले आहे. हे जैनापुर (ता.शिरोळ) येथील रेल्वे गेटजवळ चिपरी व जैनापूरच्या शेतकर्यांनी ठेकेदाराला धारेवर धरून सुरू असलेले काम बंद पाडले.
jainapur railway news : जैनापूर येथे शेतकर्यांनी रेल्वेचे काम बंद पाडले
याबाबत अधिक माहिती अशी, पुणे येथील सिनियर डेन (एस) अंतर्गत मिरज-कोल्हापूर विभागातील सुरक्षा व अतिक्रमण रोखण्यासाठी ट्रॅकवर फिक्स्ड नॉट सेफ्टी फेन्सिंगची तरतूद करण्यात आली आहे. यात 47.1 किलोमीटर कामासाठी स्कायलाईन-महालक्ष्मी जेव्ही या कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. याकरिता जवळपास 22 कोटी रुपयांची निविदा मंजूर झाली आहे.
यातूनच ठेकेदाराने जैनापूर येथे कामाला सुरुवात केली होती. ही बाब जैनापूर व चिपरी येथील शेतकर्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी एकत्रित येत स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांची भेट घेऊन चर्चा केली.
त्यानंतर जैनापूर येथे काम सुरू असलेल्या ठिकाणी शेतकर्यांनी धाव घेवून ठेकेदाराला याबाबत विचारणा केली. रेल्वे कर्मचारी व कामाचा सुपरवायझर यांना शेतकर्यांच्या शेतीची मोजणी करून हद्द निश्चित करा. रेल्वेच्या हद्दीही शेतकर्यांना दाखवा अशी मागणी करीत सुरू असलेले काम बंद पाडले. यावेळी अमोल संकपाळ, वर्धमान मगदूम, बाहुबली चौगुले, सुरेश शहापुरे, गोपाळसिंग राजपूत, प्रकाश पाटील, तेजपाल पाटील, रवींद्र मगदूम, विठ्ठल जगदाळे, धैर्यशील दळवी, दीपक पाटील, चेतन पाटील, अनिल पाटील, सम्राट दळवी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
रेल्वेरोको करणार…
तर शेतकर्यांच्या जमिनीची मोजणी व रेल्वेच्या हद्दी निश्चित केल्याशिवाय काम सुरू केल्यास रेल्वे रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा स्वाभिमानीचे विक्रम पाटील यांनी दिला.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











