kolhapur crime news : गणेश मंडळातून घरी आला अन् शाळकरी मुलाने गळफास लावून घेतला

SHARE:

kolhapur crime news : गणेश मंडळातून घरी आला अन् शाळकरी मुलाने गळफास लावून घेतला : गेली अकरा दिवस घरासमोरच्या सार्वजनिक गणेश मंडळात उत्साहाने वावरल्यानंतर रविवारी सकाळी मंडळातून घरी आलेल्या शाळकरी मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. करण कृष्णात गायकवाड (वय 14, रा. चाफोडी तर्फ तारळे, ता. राधानगरी) असे मृत मुलाचे नाव आहे.

kolhapur crime news : गणेश मंडळातून घरी आला अन् शाळकरी मुलाने गळफास लावून घेतला

सीपीआर पोलिस चौकीतून मिळालेल्या माहितीनुसार, नववीच्या वर्गात शिकणारा करण हा चाफोडी येथे आई, वडील आणि लहान बहिणीसोबत राहत होता. गेली अकरा दिवस तो घरासमोरच्या सार्वजनिक गणेश मंडळात सक्रिय होता. शनिवारी रात्री उशिरा विसर्जन झाल्यानंतर तो घरी आला.

रविवारी सकाळी आई, वडील शेतात गेले होते, तर लहान बहीण शेजारी खेळत होती. करण हा मंडळातील साहित्य काढण्यासाठी गेला होता. साडेदहाच्या सुमारास तो घरात आला. काही वेळाने बहीण घरात निघाली असता तिला दरवाजा आतून बंद असल्याचे लक्षात आले. तिने मंडळातील मुलांना बोलवून दरवाजा उघडण्यास सांगितले.

दरवाजा आतून बंद असल्याने तरुणांनी घराची कौले काढून पाहिले असता करण याने लाकडी वाशाला गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. याची माहिती मिळताच त्याच्या नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला.

मंडळातील कार्यकर्त्यांसह संपूर्ण गाव या घटनेने हळहळले. सीपीआरमध्ये उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली. आत्महत्येच्या कारणाचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *