danoli crime news : दानोळीत दहशत निर्माण करणार्या सहा जणांवर गुन्हे : दानोळी (ता. शिरोळ) येथे चाकू वजा फायटर असे हत्यार घेऊन अंगावर धावून जाऊन दहशत निर्माण केल्याप्रकरणी सहा जणांच्या विरोधात पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. ही घटना काल रात्री उशिरा दानोळी येथील ईदगाह मैदानजवळ घडली. यातील तिघेजण दानोळी तर दोघेजण सांगली येथील आहेत.
danoli crime news : दानोळीत दहशत निर्माण करणार्या सहा जणांवर गुन्हे
दरम्यान किशोर महादेव नाईक, संदीप यशवंत कदम, सतीश गावडे (तिघे रा. दानोळी), सुशांत काळे, प्रशांत काळे (दोघे रा. सांगली) व अज्ञात एक जण चिपरी येथील आहे. अशी गुन्हा नोंद झालेल्या संशयीतांची नावे आहेत. याबाबत आनंदा राजाराम फोंडे (वय 36 रा. दानोळी) याने जयसिंगपूर पोलिसात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी, सुशांत काळे याचा दानोळीत बॅनर लावला होता हा बॅनर काढण्यास सांगितल्याच्या कारणावरून काल रात्री उशिरा आनंदा फोंडे यांच्या ईदगाह मैदानजवळ असलेल्या घरासमोर संशयतांनी येऊन चाकू वजा फायटरचा धाक दाखवून शिवीगाळ केली.
आईला म्हातारे तुला जिवंत राहायचे आहे का नाही असे धमकावल्याचे फोंडे यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत जयसिंगपूर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











