kolhapur ganpati news : कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीत दहा ट्रॉली चपला

SHARE:

kolhapur ganpati news : कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीत दहा ट्रॉली चपला: गणेश विसर्जन मिरवणूक मिरवणुकीची सांगता आणि कोल्हापुरात चपलांचे जागोजागी पडलेली ढीग असे नवे चित्र गेल्या काही वर्षात कोल्हापुरात पाहायला मिळत आहे. आज विसर्जन मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर हेच दृश्य पुन्हा कोल्हापूर शहरात अनेक ठिकाणी पाहायला मिळाले. यावर्षीच्या मिरवणुकीची सांगता झाली 25 तासानंतर सांगता झाली. तेव्हा शहरात दहा ट्रॅक्टर चपलांचा ढीग पडल्याचे दिसून आले. आरोग्य विभागाच्या वतीने त्याचा तातडीने उठाव करण्यात आला.

kolhapur ganpati news : कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीत दहा ट्रॉली चपला

कोल्हापूर शहरात गणेशोत्सव वाजत गाजत साजरा केला जातो. त्याची विसर्जन मिरवणूक ही तितक्याच दणक्यात निघते. यंदा कोल्हापुरातील विसर्जन मिरवणुकीला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगलेच पाठबळ मिळालेले होते. इराणीखणीमध्ये सार्वजनिक मंडळाच्या 1561 तर घरगुती मंडळाच्या लहान 1203 गणेश मूर्तींचे पर्यावरण विसर्जन करण्यात आले. सुमारे 25 तासाहून अधिक काळ ही मिरवणूक सुरू होती.

विसर्जन मिरवणुकीच्या वेळी कोल्हापूर महापालिकेचा आरोग्य विभाग, धर्माधिकारी प्रतिष्ठान व अवनी संस्थेकडून विसर्जनाच्या ठिकाणी 35 टन निर्माण संकलित करण्यात आले. ते 10 डंपरद्वारे खत प्रक्रिया केंद्रात पाठवण्यात आले. परंतु याचवेळी मिरवणूक मार्गावर वेगळेच दृश्य पाहायला मिळाले. गेल्या दोन-तीन वर्षाप्रमाणे याही वेळी मिरवणूक मार्गावर चपलांचा अक्षरशः खच पडलेला होता.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *