jain samaj news : सांगलीमध्ये पर्युषन पर्वाची भव्य मिरवणूकीने सांगता : शेठ रा. ध. दावडा दिगंबर जैन बोर्डिंग, सांगली येथील श्री 1008 भगवान आदिनाथ जैन मंदिरात पर्यूषण पर्व मागील दहा दिवसापासून मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात पार पडले. या काळात सकाळी अभिषेक, शाीत्रपूजा, पूजा-विधी, आरती तर संध्याकाळी भजन, प्रवचन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घेतला. पर्यूषण पर्वामध्ये अहिंसा, सत्य, अपरिग्रह, संयम, क्षमा, आत्मशुद्धी अशा तत्त्वांचा अंगीकार करून शेकडो जैन बंधू-भगिनींनी उपवास व व्रतांचे पालन केले. मंदिर परिसर मागील दहा दिवसापासुन गर्दीने फुलुन गेला होता.
jain samaj news : सांगलीमध्ये पर्युषन पर्वाची भव्य मिरवणूकीने सांगता
या पर्वाचा समारोप अनंत पोर्णिमेच्या दिवशी रविवारी पालखी मिरवणुकीने करण्यात आले. मंदिर व परिसर फुलांनी सजविण्यात आले होते. सजविलेल्या रथात श्री भगवान अनंतनाथ यांची प्रतिमा विराजमान करून जैन बोर्डिंग मंदिरापासून मिरवणूकीची सुरुवात झाली. ही मिरवणूक गणपती पेठ, आरवाडे बस्ती, मारुती चौक, गावभाग जैन मंदिर, कृष्णा नदीकाठ, गणपती मंदिर या प्रमुख मार्गांवरून नगरप्रदक्षिणा केली. ठिकठिकाणी भाविकांनी आरती, नैवेद्य, फुलांचा वर्षाव, रांगोळ्या, भजन-कीर्तन यांच्या माध्यमातून स्वागत केले. मार्गात श्रद्धाळूंनी घराघरांतून दिवे लावून व पाण्याची सोय करून भक्तिभावाने सेवा बजावली.

या सोहळ्यात शेठ रा. ध. दावडा दिगंबर जैन बोर्डिंग, गावभाग जैन मंदिर, आरवाडे जैन मंदिर यांच्यासह इतर अनेक जैन संस्थांचा उत्स्फूर्त सहभाग होता. महिला मंडळ, युवक मंडळ तसेच बालकांनीही मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. पालखी रथाच्या पुढे-मागे झांजपथक, ढोल-ताशा, घोषवाक्यांचा गजर, धार्मिक ध्वज, पारंपरिक पोशाखातील भाविक, रथ सजावट यामुळे संपूर्ण मिरवणूकीची शोभा वाढली. भावीकांच्यासाठी स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
Paryushan Parva concludes with grand procession in Sangli
पालखी रथ मिरवणूक पुन्हा बोर्डिंग मंदिरात आल्यानंतर पंचामत अभिषेक पुजा विधी संपंन्न झाला. शेवटी क्षमावाणी कार्यक्रम घेण्यात आला ज्यामध्ये भाविकांनी मनोमन परस्परांची क्षमा मागून पर्यूषण पर्वाची सांगता केली.
या कार्यक्रमासाठी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष श्री. भालचंद्र पाटील, सांगली विभागाचे उपाध्यक्ष प्रा. राहुल चौगुले, महामंत्री प्रमोद पाटील, महीला महामंत्री श्रीमती अनिता पाटील, बोर्डिंगचे चेअरमन प्रशांत अवधुत, व्हा. चेअरमन राजेश पाटील, सेक्रेटरी अॅड. मदन पाटील, पदवीधर संघटनेचे व्हा. चेअरमन प्रशांत पाटील मजलेकर, बोर्डिंगचे जॉ. सेक्रेटरी संदिप हिंगणे, सुपरिटेंडेंट राजेंद्र शेटे, जॉ. सुपरिटेंडेट विशाल चौगुलेे, कर्मवीर आरोग्य अभियानचे चेअरमन डॉ. देवपाल बरगाले, श्रीमती कुसुम चौधरी, गाव भाग मंदिर कमिटीचे चंद्रकांत पाटील, राजेंद्र पाटील, बी. के. पाटील, बोर्डींगचे सर्व सदस्य, विद्यार्थी तसेच सांगली नगरीतील सर्व श्रावक श्राविका बहुसख्येने उपस्थित होते.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











