kolhapur crime news : रेबीजची लागण झाल्याने शिरोलीतील सोनाराचा मृत्यू

SHARE:

kolhapur crime news : रेबीजची लागण झाल्याने शिरोलीतील सोनाराचा मृत्यू : शिरोली : येथील तानाजी श्रीरंग साळुंखे (वय 42, मूळ रा. ढवळेश्वर, ता. विटा, जि. सांगली; सध्या रा. साई कॉलनी, शिरोली) यांचा रेबीजने रविवारी सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या घटनेमुळे शिरोली परिसरात खळबळ उडाली आहे.

kolhapur crime news : रेबीजची लागण झाल्याने शिरोलीतील सोनाराचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, तानाजी साळुंखे हे गेल्या 15 वर्षांपासून शिरोलीत राहतात. ते सोनार व्यवसाय करीत होते. दीड महिन्यापूर्वी ते आपल्या 7 वर्षांच्या मुलीला घेऊन खाऊ आणण्यासाठी शिरोली फाटा येथे गेले होते. तेव्हा त्यांच्या दुचाकीच्या दिशेने एका भटक्या कुत्र्याने धाव घेतल्याने ते रस्त्यावर पडले. या अपघातात त्यांच्या उजव्या खांद्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात शस्त्रक्रिया केली होती.

मात्र, गेल्या तीन-चार दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीत अचानक बदल दिसू लागला. शुक्रवारी त्यांना पाण्याची भीती वाटू लागली, कंठ दाटून येत होता तसेच खाण्याचा त्रास जाणवू लागला. नातेवाइकांनी त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय तपासणीनंतर मानसोपचारतज्ज्ञांनी हे लक्षण श्वानदोष (रेबीज) असल्याचे निदर्शनास आणले.

सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू असताना साळुंखे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, नातेवाईक असा परिवार आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *