kavtemankhal murdar news : घाटनांद्रेतील तरूणाचा तिसंगीत दगडाने ठेचून खून

SHARE:

kavtemankhal murdar news : घाटनांद्रेतील तरूणाचा तिसंगीत दगडाने ठेचून खून: कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटमाथ्यावरील घाटनांद्रे येथील 28 वर्षीय तरुणाचा तिसंगी हद्दीत रस्त्यालगत अज्ञातानी दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना सोमवार दि.8 सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली.सुनिल विलास शिंदे असे खून झालेल्पा तरूणाचे नांव आहे.

kavtemankhal murdar news : घाटनांद्रेतील तरूणाचा तिसंगीत दगडाने ठेचून खून

कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांकडून समजलेली व घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी की, घाटनांद्रे येथील ट्रॅक्टर चालक असलेला सुनील शिंदे याचा मृतदेह सोमवारी सकाळी तिसंगी येथील रस्त्याच्या कडेला आढळून आला. मृतदेहाजवळ रक्ताने माखलेला मोठा दगड आढळून आल्यामुळे हा खून दगडाने ठेचून करण्यात आला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

घटनेची माहिती मिळताच कवठेमहांकाळचे पोलीस निरीक्षक जोतीराम पाटील व उपनिरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांनी पोलीसासह घटनास्थळी तातडीने भेट दिली. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला.अतिरिक्त पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी घटनास्थळी भेट दिली. तपासासाठी श्वान पथक व फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले होते.

कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात सध्या अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुनाचे नेमके कारण अद्याप समजले नाही. पोलीस विविध अंगांनी तपास करत असून लवकरच गुन्हेगाराचा छडा लावण्यात येईल असा विश्वास पोलिस निरीक्षक जोतिराम पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *