mouje digraj crime news: मौजे डिग्रजमध्ये घरासमोर फटाके फोडणार्या तिघांवर गुन्हा दाखल. : घरात वृध्द आणि लहान मुले असल्याने घरापुढे फटाके वाजवू नका असे सांगून देखील मुद्दामहून घरासमोरच फटाके उडवून दमदाटी करणार्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिरज तालुक्यातील मौजे डिग्रज येथे शनिवारी सकाळी 9 च्या सुमारास हा प्रकार घडला.
mouje digraj crime news: मौजे डिग्रजमध्ये घरासमोर फटाके फोडणार्या तिघांवर गुन्हा दाखल.
याबाबत वसंत आप्पाजी श्रीरंबेकर (रा. मौजे डिग्रज) यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सौरभ सरदार कुलकर्णी (23), दिग्वीजय सुभाष श्रीरंबेकर (27) आणि मयुरेश रविंद्र पाटील (24, सर्व रा. मौजे डिग्रज) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, वसंत श्रीरंबेकर हे आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील मौजे डिग्रज गावामध्ये राहतात. शनिवारी असलेल्या अनंत चतुर्दशी निमित्त मिरज तालुक्यातून गणेश विसर्जन मिरवणूका काढण्यात येत होत्या.
मौजे डिग्रज येथे सकाळी 9 वाजता मिरवणूक फिर्यादी वसंत श्रीरंबेकर आणि त्यांच्या शेजारी असणार्या अमृता अनिलकुमार मगदूम यांच्या घरासमोरुन जात होती. त्यावेळी फिर्यादी वसंत श्रीरंबेकर यांनी संशयितांना घरात लहान मुल आणि वृध्द व्यक्ती असल्याने आमच्या घरासमोर फटाके वाजवू नका असे सांगितले.
mouje-digraj-crime-news-a-case-has-been-registered-against-three-people-who-burst-crackers-in-front-of-a-house-in-mouje-digraj
मात्र संशयितांनी मुद्दामहून त्यांच्या घरासमोरच फटाके वाजविले तसेच फिर्यादी वसंत श्रीरंबेकर यांना दमदाटी केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











