satej patil news : विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी सतेज पाटलांच्या नावाची चर्चा

SHARE:

काँग्रेस नेत्यांची थेट मातोश्रीवर उद्धव ठाकरेंसोबत बैठक;

satej patil news : विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी सतेज पाटलांच्या नावाची चर्चा : राज्यात एकीकडे आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा-ओबीसीमध्ये वादंग उभं राहिले असताना ’हैद्राबाद गॅझेटीयर’वरून सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तर सध्या सुरु असलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा- ओबीसीसह बंजारा समाजानेही बैठकीचं सत्र सुरु केल्याचे चित्र आहे. अशातच आता मातोश्रीवर देखील काँग्रेस नेत्यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक होते आहे. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेस दावा सांगणार असून सतेज पाटील यांच्या नावाची विधान परिषद विरोधी पक्ष नेते पदासाठी वर्णी लागण्याची चर्चा आहे.

satej patil news : विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी सतेज पाटलांच्या नावाची चर्चा

विधान परिषद विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसचा दावा

मिळालेल्या माहितीनुसार, अंबादास दानवे यांचे विरोधी पक्षनेते पदाचा कार्यकाळ 29 ऑगस्टला पूर्ण झाला. त्यानंतर विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेस आग्रही आहे. सध्या विधान परिषदेत विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसचे आठ आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा आमदार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत विधानस परिषद विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसने दावा केला असल्याची सूत्रांची माहिती आहे. या सगळ्या संदर्भात उद्धव ठाकरे यांच्यासोबत काँग्रेस नेते चर्चा करत असल्याचीही माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

विधानपरिषद पक्षीय बलाबल

ठाकरे सेने – 6
काँग्रेस – 8
राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) – 2
उद्धव ठाकरे गटाचे आमदार
उद्धव ठाकरे, मिलिंद नार्वेकर, ज मो अभ्यंकर, अनिल परब, सुनील शिंदे, सचिन अहिर

काँग्रेस आमदार
सतेज पाटील, प्रज्ञा सातव, भाई जगताप, अभिजीत वंजारी, धीरज लिंगाडे, राजेश राठोड, जयंत आसगावकर ( पुणे शिक्षक मतदार संघ ), सुधाकर आडबाले ( नागपूर शिक्षक मतदार संघ )

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कशा लढायच्या, विधान परिषदेच्या विरोधी पक्षपदासंदर्भात देखील चर्चा झाली. नक्कीच सतेज पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र अंतिम निर्णय दिल्लीतील हायकमांडच्या चर्चेनंतर अधिक माहिती दिली जाईल, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली.

मनसे आणि शिवसेना एकत्र येत असेल तर काँग्रेस सोबत राहणार का?

दरम्यान, उद्धव ठाकरे यांची काँग्रेस नेत्यांसोबत मनसेच्या युती संदर्भात सुद्धा चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. मनसे आणि शिवसेना युती संदर्भात राज्यातील काँग्रेसकडून पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाची प्रतीक्षा असणार आहे. मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र येत असेल तर काँग्रेस पक्ष सोबत राहणार का? या बाबत अंतिम निर्णय काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून घेण्यात येणार आहे. याबाबत पक्षश्रेष्ठीं सोबत राज्यातील काँग्रेसचे नेते चर्चा करणार आणि त्यानंतर स्थानिक स्वराज्य निवडणुका संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती समोर आली आहे

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *