samdoli news : बाबासाहेब पाटील यांच्या निधनाने एक युगच संपल्याची भावना

SHARE:

samdoli news : बाबासाहेब पाटील यांच्या निधनाने एक युगच संपल्याची भावना : समडोळी गावाने आपला मार्गदर्शक, प्रेरणादायी नेतृत्व आणि समाजासाठी आयुष्यभर झटणारा सच्चा कार्यकर्ता गमावला आहे. आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक चेअरमन, समडोळीतील ज्येष्ठ नेते माननीय बाबासाहेब पाटील यांच्या निधनाने एक युगच संपल्याची भावना अनेक मान्यवरांनी व्यक्त केले.

samdoli news : बाबासाहेब पाटील यांच्या निधनाने एक युगच संपल्याची भावना

मिरज तालुकयातील समडोळी येथील ज्येष्ठ नेते बाबासाहेब आण्णासाहेब पाटील यांचे नुकतेच निधन झाले. यानंतर पंचक्रोशितील आणि जिल्ह्यातील अनेक राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी पाटील कुटुंबीयांना भेटून त्यांचे सांत्वन केले.

समाजासाठी आयुष्य अर्पण

धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय अशा सर्वच क्षेत्रात बाबासाहेब पाटील यांनी आपली भक्कम छाप उमटवली. प्रत्येक क्षेत्रात त्यांनी समर्पित भावनेने काम केले. समडोळी गावाच्या प्रगतीसाठी त्यांनी झटलेली धडपड म्हणजे एक आदर्श आहे.

समडोळीतील श्री 1008 भगवान महावीर जीन मंदिराचे अध्यक्षपद त्यांनी अनेक वर्षे भूषवले. मंदिराच्या सेवेत त्यांनी वाहिलेला काळ म्हणजे भक्तीभाव आणि समाजसेवेचे सुंदर मिश्रण होते. धर्मकार्याला सामाजिक ऐक्याची जोड देणारे त्यांचे कार्य गावकुसात सदैव स्मरणात राहील.

बाबासाहेब पाटील यांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे केवळ नेते नव्हते, तर गावातील प्रत्येक घराला आधार देणारे एक वडीलधारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे मार्गदर्शन म्हणजे गावासाठी दीपस्तंभच होते. त्यांच्या निधनाने समडोळीवर आणि त्यांच्या कुटुंबावर आलेला आघात अपरिमित आहे. त्यांच्या अनुपस्थितीत गावकुसाला जणू पोकळी जाणवू लागली आहे.
या प्रसंगी आमदार जयंतरावजी पाटील, आमदार सत्यजित देशमुख, आमदार राहुल आवाडे व त्यांच्या कुटुंबीयांसह खासदार विशाल पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, खासदार धैर्यशील माने, सांगलीचे माजी महापौर सुरेश पाटील, दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, केंद्रीय उपाध्यक्ष रावसाहेब पाटील, शैलजाभाभी पाटील, आष्टा पीपल्स बँकेचे चेअरमन दिलीप वग्यानी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, सांगलीचे हर्षवर्धन पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य भीमराव माने यांनी प्रत्यक्ष भेट देऊन कुटुंबीयांना धीर दिला.

samdoli-news-the-death-of-babasaheb-patil-feels-like-the-end-of-an-era

गावकुसाची न भरून येणारी पोकळी

बाबासाहेब पाटील यांचे जाणे हे केवळ एका व्यक्तीचे निधन नाही, तर एका युगाचा अस्त झाला आहे. त्यांनी घडवलेल्या संस्था, जपलेली नाती आणि समाजासाठी केलेली कामगिरी हीच त्यांच्या स्मृतींचा खरा ठेवा ठरेल. त्यांच्या जाण्याने समडोळीच्या अंगणात एक रिक्तपणा निर्माण झाला आहे, जो कधीही भरून निघू शकणार नाही.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *