चाकाखाली दोन मेंढ्याचा मृत्यू व पाच मेंढ्या जखमी
dudhgaon accident news: बावची फाट्याजवळ ट्रकच्या धडकेत दुधगावच्या तरूणाचे निधन: पेठ – सांगली रस्त्यावर बावची फाटा तालुका वाळवा येथे मंगळवारी दुपारी पाऊने एक वाजणेच्या सुमारास ट्रक क्र.एम.एच.45 . 0126 वरील मद्यधुंद अवस्थेतील चालक उत्तम गणपती साळुंखे वय 45 रा.संजयनगर, सांगली याने दुचाकी क्र. एम.एच.10 टी 5789 वरील संजय आनंदा धनवडे वय 50 व संदीप आदिनाथ पाटील वय 32 दोघेही रा.दुधगाव ता.मिरज या दोघांसह मेंढरांच्या कळपाला चिरडले.
dudhgaon accident news: बावची फाट्याजवळ ट्रकच्या धडकेत दुधगावच्या तरूणाचे निधन
यामध्ये मोटरसायकल स्वार संजय आनंदा धनवडे व दोन मेंढ्या ठार झाल्या. सुदीप सुकुमार पाटील व अन्य 5 मेंढ्या गंभीर जखमी झाल्या. यात मेंढपाळाचे अंदाजे 90 हजारांचे नुकसान झाले. जखमी संदीप आदिनाथ पाटील याने आष्टा पोलिसांना फिर्याद दिली आहे.
या घटनेची नोंद आष्टा पोलीस ठाण्यात झाली आहे. याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, बावची ता. वाळवा येथील नानासो ज्योतिराम अनुसे रा. बावची व त्यांचे सहकारी हे मेंढराचा कळप घेऊन बावची येथून आष्टयाच्या दिशेकडे चालले होते. यावेळी पाठीमागून इस्लामपूर येथून आष्ट्याच्या दिशेने भरधाव वेगाने येत मद्यधुंद ट्रक चालक उत्तम साळुंखे याने बावची फाटा येथे मेंढराच्या कळपात ट्रक घुसवला.
यावेळी पाठीमागून येत असणार्या दुधगाव तालुका वाळवा येथील मोटरसायकलस्वार संजय धनवडे व संदीप पाटील यांनी मेंढ्या चाकाखाली चिरडत असल्याची माहिती ट्रकचालक यांना देत असताना त्या चालकाने त्या दोघांनाही जागीच चिरडले.
यामध्ये संजय धनवडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर मोटरसायकल चालक संदीप पाटील हे रस्त्याच्या कडेला उचलून फेकले गेल्याने या अपघातात ते गंभीर जखमी झाले. याबाबतची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.
dudhgaon-accident-news-a-young-man-from-dudhgaon-died-in-a-truck-collision-near-bavchi-phata
तर मयत व जखमी यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी दुधगाव व परिसरातील नागरिकांनी ग्रामीण रुग्णालया बाहेर गर्दी केली होती. आष्टा पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सत्यजितआवटे यांनी ग्रामीण रुग्णालय व घटनास्थळ भेट देऊन घटनेची माहिती घेतली.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











