karamvir patsanshta : कर्मवीर पतसंस्थेतर्पे 22 रोजी भास्करराव पेरे-पाटील यांचे व्याख्यान: कर्मवीर भाऊराव पाटील यांची 138 वी जयंतीनिमित्त सोमवार दि.22 आदर्श सरपंच भास्करराव पेरे-पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. अध्यक्षस्थान जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सरोजमाई पाटील या भूषविणार असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती भारती चोपडे यांनी दिली.
karamvir patsanshta : कर्मवीर पतसंस्थेतर्पे 22 रोजी भास्करराव पेरे-पाटील यांचे व्याख्यान
कर्मवीर जयंतीनिमित्त संस्था व कर्मवीर चॅरीटेबल ट्रस्टच्यावतीने दरवर्षी निरनिराळ्या सामाजिक उपक्रमांनी साजरी केली जाते. 22 सप्टेबर रोजी जयंतीनिमित्त आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. अध्यक्षस्थानी जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सरोजमाई एन. डी. पाटील असून रत्नाकर बँकेचे माजी चेअरमन अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती आहे.
तसेच यादिवशी आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याचे उपाध्यक्ष अॅड एस.पी. मगदूम यांनी सांगितले. सोमवारी दुपारी 3 वाजता ऐश्वर्य मल्टीपर्पज हॉल, धामणी -फळ मार्केट रोड, ए. बी. पाटील इंग्लिश स्कूलजवळ इनाम धामणी येथे संपन्न होणार आहे.
विविध सामाजिक संस्था व व्यक्तीना मदतीचा धनादेश कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने प्रदान करण्यात येणार असल्याचे वसंतराव नवले यांनी सांगितले. यावेळी ट्रस्टचे कार्यवाह डॉ. चेतन पाटील, संस्थेचे संचालक रावसाहेब पाटील, डॉ. अशोक सकळे, डॉ. रमेश ढबू ओ. के. चौगुले, डॉ. एस. बी. पाटील, चंदन केटकाळे, तज्ञ संचालक डॉ. नरेंद्र खाडे, लालासाहेब थोटे व मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल मगदुम आदी उपस्थित होते.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











