padalkar news : आ. पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा सोमवारी निषेध मोर्चा

SHARE:

padalkar news : आ. पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा सोमवारी निषेध मोर्चा : भाजपचे आ. गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते आ. जयंत पाटील यांच्याबद्दल अपशब्द काढल्याच्या निषेधार्थ  सांगलीत निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे राज्यातील अनेक खासदार, आमदार व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी आ. पडळकर यांचा तातडीने राजीनामा घ्यावा व जत अभियंत्याच्या मृत्यू प्रकरणी सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले.

padalkar news : आ. पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा सोमवारी निषेध मोर्चा

पक्षाचे राज्यातून खासदार, आमदार, पदाधिकारी उपस्थित राहणार

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, सरचिटणीस बाळासाहेब पाटील, निरीक्षक शेखर माने, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी संयुक्तरित्या पत्रकार बैठकीचे आयोजन केले होते.

जिल्हाध्यक्ष देवराज पाटील म्हणाले, जत येथील शाखा अभियंता अवधूत वडार याच्या मृत्यूबाबत गंभीर आरोप झाले. यामध्ये अनेकांची नावे ही वडार यांच्या नातेवाईकांनी घेतली. त्यानंतर समाजातून संताप व्यक्त होऊ लागला. त्या सर्व घटनेवरून लक्ष विचलित करण्यासाठी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पक्षाचे नेते आ. जयंत पाटील, लोकनेते राजारामबापू पाटील यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर टीका केली.

जिल्ह्यासह राज्यभरातील अनेक पक्षातील नेत्यांनी सामाजिक कार्यकर्ते विचारवंत यांनी या वक्तव्याचा निषेध केला आहे. भाजपमधील अनेक नेत्यांनी सुद्धा खंत व्यक्त केली आहे. सांगली जिल्हा पुरोगामी विचाराचा आहे. वाचाळविरांना थांबविणे आवश्यक आहे. त्यामुळे आ. पडळकर यांना मुख्यमंत्र्यांचे पाठबळ आहे का? नसेल तर त्यांनी आ. पडळकर यांचा राजीनामा द्यावा, असे मत त्यांनी व्यक्त केले.

padalkar-news-nationalist-sharad-pawars-party-holds-protest-march-against-a-padalkar-on-monday

शेखर माने म्हणाले, आ. पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राज्यभरातून खासदार-आमदार सांगलीत येणार आहे. यामध्ये प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे, खा. धैर्यशील मोहिते-पाटील, खा. अमोल कोल्हे, खा. निलेश लंके, खा. बजरंग सोनवणे, आ. जितेंद्र आव्हाड, आ. रोहित पवार यांच्यासह अनेक आमदार, खासदार व पक्षाचे राज्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संजय बजाज म्हणाले, सांगलीतील पुष्पराज चौकातून दुपारी एक वाजता या निषेध मोर्चाला सुरुवात होणार आहे. जिल्हा परिषद समोरून राममंदिर कॉर्नर, पंचमुखी मारुती रोड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मेन रोड, भारती विद्यापीठ समोरून राजवाडा चौक ते स्टेशन चौक या मार्गाने राजारामबापू पुतळ्यासमोर या मोर्चाचा समारोप होईल. त्या ठिकाणी सभा होणार आहे. या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तसेच इतरही अनेक पक्षाचे आमदार खासदार लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी सांगली विधानसभा क्षेत्र प्रमुख सचिन जगदाळे, माजी स्थायी समिती सभापती हरिदास पाटील, युवकचे राजू पाटील आदी उपस्थित होते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *